पंढरपूर प्रतिनिधी --
अयोध्या येथे श्रीराम लल्लाच्या मूर्तीची स्थापना होत असून त्यापूर्वी शुक्रवार 19 रोजी येथे वीस फुटी श्रीराम मूर्तीची मिरवणूक आयोजित केली असल्याची माहिती युवक नेते प्रणव परिचारक यांनी दिली.
येथील समस्त श्रीराम भक्तांकडून सदर मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सदर वीस फुटाच्या श्रीराम मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. येथून चौफळा मार्गे प्रदक्षणा मार्गावरून सदर मिरवणूक निघणार आहे. यावेळी सर्वांनी मूर्तीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करावे असे आवाहन प्रणव परिचारक यांनी केले आहे.
Tags
धार्मिक वार्ता