ऊसाच्या चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा ---- आबासाहेब साळुंखे

अकलूज  (प्रतिनिधी) 
यापुढील काळात उसाची शेती ही आता ढोबळ मानाने करून उत्पन्न मिळणार नाही.ऊस पिकाला सशक्त बनवायचे असेल तर जमिनीचा पोत,प्रत ओळखून इतर खतांच्या मात्रे बरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस दिलाच पाहिजे. असे मत वसंतदादा शुगर इंडस्ट्रीचे माजी शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांनी येथे बोलताना व्यक्त केले.या चर्चासत्राचा प्रारंभ ऊसाच्या रोपाला पाणी घालून करण्यात आला.
        अपुऱ्या पाणी सिंचनामध्ये ऊस पिकाचे नियोजन या चर्चासत्राचे आयोजन शुगरकेन सहकारी सोसायटी माळीनगर आणि जैन ॲग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या चर्चासत्राच्या प्रसंगी बोलताना साळुंखे म्हणाले की,यंदाचा येणारा उन्हाळा आणि निर्माण होणारी पाणीटंचाई याचा विचार करता ऊस पिकासाठी ऊसामध्ये पाचटाचे आच्छादन करून ड्रिंचिंग करणे, त्याच्या जोडीला बायोसी आणि बायो फर्टीलायझरचा वापर करून ऊसावर केओलिन आणि बायोसीची  फवारणी करावी म्हणजे भविष्यातील पाणीटंचाईचे येणारे संकटापासून ऊस पिकाचे संरक्षण होण्यास मदत होईल. असे साळुंखे यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना सांगितले.
         साळुंखे पुढे बोलताना म्हणाले ऊसाला आपण ज्यावेळेस भरणीचा डोस करतो त्यावेळी पाच ते दहा टक्के ही सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरलीच पाहिजे.ऊसाच्या कडेने आठ ते बारा इंच मातीची शिग लागली पाहिजे आणि या  खत मात्रेमध्ये २० -२०, केओलीन,ग्रीन सील अल्ट्रा,अशा पूर्ण अन्नद्रव्याची खते द्यावीत.यामुळे पिकाची वाढ होते,उत्पन्नात वाढ होते, उन्हाळ्यात पाणीटंचाई सोसण्यास पीक सक्षम राहते.कार्यक्रमाच्या सुरवातीला सागर चौगुले यांनी उपस्थितांचे स्वागत करून विविध खत वापराची माहिती दिली.
          यावेळी व्यासपीठावर शुगरकेन सोसायटीचे उपाध्यक्ष कपिल भोंगळे,जैन ॲग्रोचे संचालक सुरज घुमाई,सोमनाथ हुल्ले उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार संस्थेचे मॅनेजर अनिल गिरमे यांनी मानले.हा कार्यक्रम सोसायटीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form