22 जानेवारी रोजी राज्यामध्ये मांसाहार व दारु विक्री बंद करावी - सुधाकर महाराज इंगळे

पंढरपूर प्रतिनिधी ----
22 जानेवारी 2024 हा दिवस भारतीयांसाठी खूपच महत्त्वाचा असून ऐतिहासिक आहे. हा आम्हा सर्वांसाठी सुवर्ण अक्षरांनी नोंद करण्यात यावा असा दिवस आहे. कारण प्रभु श्रीरामचंद्र मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापना अयोध्या येथे करण्यात येणार आहे. या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत. त्यामुळे 21 व 22 जानेवारी 2024 या दोन दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात मांसाहार व दारु विक्री बंद करण्यात यावी. मांसाहारा मुळे असुरी विचार बळावतात असे अनेक ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. असुरी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी हे आवश्यक आहे. स्वहितासाठी व देश हितासाठी खूपच महत्त्वाचे आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी तो एक दिवस उपवास करण्याचा संकल्प केला आहे. आपण भारतीयांनी सुद्धा एक संकल्प केला पाहिजे. तो म्हणजे हा एक दिवस तरी पुर्ण सात्विक आहार घेऊन आपली सेवा श्रीरामाचे चरणी अर्पण करावी . तसेच आपल्या परिसरातील मंदिर, सार्वजानिक हॉल अशा ठिकाणी 22 ताला दुपारी भजन ,  कीर्तन, प्रवचन , कथा करुन उत्सव साजरा करावा, हा राष्ट्रिय उत्सव झाला पाहिजे असे प्रयत्न सर्वांनी करावेत असे आवाहन ही इंगळे महाराज यांनी केले आहे.       
     महाराष्ट्र शासनाचे माध्यमातून आदेश काढून संपूर्ण राज्यामध्ये मांसाहार व दारु विक्री बंद करण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे देण्यात आले आहे असे सुधाकर महाराज इंगळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. 
       आपला
सुधाकर महाराज इंगळे
(राष्ट्रीय अध्यक्ष - अखिल भाविक वारकरी मंडळ)
मो. न. 9422462681

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form