आ.मा.यशवंत (तात्या) माने यांचा मौ.तरटगाव(ता.मोहोळ)ग्रामस्थ व कोळी समाज बांधवांकडून सन्मान व सत्कार

आ.मा.यशवंत(तात्या)माने यांनी
तरटगाव(ता.मोहोळ) गावाबाबत लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले
मोहोळ प्रतिनिधी --- 
नागपुर हिवाळी अधिवेशनात आ.मा.यशवंत(तात्या)माने यांनी मतदार संघातील मौजे तरटगाव(ता.मोहोळ) गावा बाबत लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले तसेच मतदार संघातील मौजे तरटगाव
(ता.मोहोळ) हे गाव आदिवासी गाव म्हणून केंद्राने व राज्याने घोषित केले. याबाबत 
तरटगाव(ता.मोहोळ) येथिल मान्यवर नागरिक व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

आज पर्यंत ह्या गावाला कोणत्याही शासकीय सुविधा मिळाल्या नाहीत गावं विकासा पासून वंचित राहिले त्याचबरोबर कोळी,महादेव कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले मिळाले नाहीत ह्याची दखल घेत आ.मा.यशवंत(तात्या)माने यांनी
अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले व आम्हां तरटगावातील लोकांना अनमोल असे सहकार्य केले तसेच आम्हाला अनेक अडचणीनां सामोरे जावे लागत होते परंतु आमदार यशवंत माने यांनी आमच्या गावच्या व्यथा अधिवेशनात मांडून आम्हास न्याय मिळवून दिला आहे याबाबत सर्व ग्रामस्थ व कोळी समाज बांधवांकडून त्यांनचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

यावेळी गणेश दादा कोळी,सोमनाथ दवणे,कोळी समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ कोळी,कोळी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख नागेश बिराजदार,अंबादास कोळी,मोहोळ तालुकाध्यक्ष बाबुराव काका वाघमारे, निलेश कोळी,संजय संगोळगी,प्रमोद जमादार,संकेत कोळी,भिमाशंकर वाघमारे,आम सिद्ध कोळी,सतीश कोळी,संजय संगोळी,प्रमोद जमादार, सोमनाथ कोळी,पंडित वाघमारे, पांडुरंग राशी राव,सागर मोठे,विकास आसेराव, विद्यासागर दवणे,प्रदीप पाटील,रमेश खांडेकर,कानिफनाथ मोठे आदी ग्रामस्थ व बहुसंख्य कोळी समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form