पंढरचा पांडुरंग आणि मंगळवेढ्याचे दामाजीचे पुण्यभुमी म्हणजे पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ परिचित आहे, या मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तत्परतेने सोडवण्याचे काम अविरतपणे आमदार आवताडे यांच्या कडुन सुरू असून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधून प्रगती कडे वाटचाल करताना दिसून येत आहे.जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता फक्त आणि फक्त माणसातला माणूस म्हणून मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करीत राहण्याचा संकल्प करणारे लोकनेते आ. समाधान अवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला आढावा....
आमदार समाधान आवताडे यांचा जन्म सोलापूरचा. त्यांनी राज्यशास्त्र आणि साहित्यात पदवी घेतली आहे. आ.आवताडे यांनी 2014 ची निवडणूक शिवसेनेतून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी 2019 ची निवडणूकही लढवली. यावेळी ते अपक्ष उमेदवार होते. पण त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत मात्र त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यांनी मागे न पाहता पुन्हा एकदा मतदारसंघात कामाचा धडाका सुरू ठेवला. सामाजिक उपक्रम, गरजवंता मदत आणि लोकांच्या समस्यांवर त्यांच्याशी संपर्क सुरूच ठेवला.
भारत भालके यांचे निधनामुळे पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यामुळे आवताडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनेही त्यांना उमेदवारी दिली. कुठल्याही प्रकारचा सहकारी कारखाना किंवा सहकारी संस्था नसताना केवळ आपल्या कष्टाच्या बळावर आमदारकी पर्यंत मजल मारीत आपले आस्तीत्व सिध्द करण्यात आ. आवताडे यशस्वी झाले
उपमुख्यमंत्री फडणवीस यांची राजकीय ताकद आ. आवताडेंच्या पाठिशी ......
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आ समाधान आवताडे यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ संबंध संपूर्ण राज्याला माहीत आहे. समाधान आवताडे यांच्याकडे आमदारकी नसताना व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही दामाजी कारखान्याच्या मोळीपूजनाला फडणवीस यांनी हजेरी लावली होती.आमदार नसताना सुद्धा नागरिकांसोबत असलेली प्रेमाची,आपुलकीची नाळ कधीच त्यांनी तुटू दिली नाही,उलट नागरिकांसोबतची नाळ घट्ट करण्याचे काम त्यांनी केले.जनमानसामध्ये जाऊन जनमाणसाच्या समस्या जाणून घेऊन आमदार नसतांना सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. यामुळेच प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांचे मनोमिलन करत २०१९ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत परिचारक यांना बरोबर घेऊन समाधान आवताडे यांच्या प्रचारात फडणवीस यांनी मतदारसंघ पिंजून काढत समाधान आवताडे यांना निवडून आणले.त्यानंतर आ.आवताडे यांच्या ताब्यात असणारा दामाजी कारखान्यावर सत्तांतर झाल्याने आ.समाधान आवताडे यांनी खासगी कारखाना खरेदी करून त्या कारखान्याचे मोळी पूजनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते केले.यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार अवताडे यांच्यावर स्तुती सुमने उधळत त्यांच्या कार्याचे कौतुक केले व आमदार अवताडे यांनी ज्या ज्या कामांची मागणी केली आहे.त्या सर्व कामांना मी निधी देणार असून पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना ताठ मानेने जनतेसमोर पाठवणार असल्याचे सांगत त्यांनी पुढील उमेदवार हे समाधान आवताडेच असतील याचे संकेत दिले आहेत.
अवताडे शुगर च्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमांमध्ये फडणवीस यांचा उपस्थितीत विधान परिषदेचे माजी सदस्य प्रशांत परिचारक हे व्यासपीठावर उपस्थित राहून दोघांमध्ये काही मतभेद नसल्याचे फडणवीस यांच्या समोर दाखवून दिलेले आहे. फडणवीस यांनी येत्या विधानसभा निवडणुकीला आमदार आवताडे यांनी मागणी केलेली सर्व कामे पूर्ण करून त्यांना ताठ मानेने जनतेसमोर पाठविणार असल्याचे जाहीर केल्यामुळे आगामी काळात फडणवीस यांच्याकडून अवताडेंनाच ताकद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजासाठी,अहोरात्र झटणारे, विकास कामाचा प्रचंड पाठपुरावा करणारे, जनतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान असणाऱ्या आमदार समाधान अवताडे साहेबांना उत्तम आरोग्य लाभो त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
अमीन शेख,अनवली
दादानां वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
_____________________________
कोण आहेत समाधान आवताडे?
>> समाधान आवताडे यांनी 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.
>> 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आवताडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात....
>> मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीतही अपक्ष उतरण्याची आवताडेंनी तयारी केली होती...
>> आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी....
>> उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासु अशी ओळख आणि त्यांचे पाठबळावर मतदारसंघात केलेल्या विकासात्मक कामाचे जोरावर आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीत आ. अवताडे हे भाजपाचे उमेदवार असणार हे स्पष्ट...
Tags
राजकीय वार्ता