पंढरीत वृत्तपत्र विक्रेता दिन मोठ्या उत्साहात साजरा

पंढरपूर, दि. 15 ( प्रतिनिधी )
 उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा भल्या पहाटे उठायचे, वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. सायकलवरुन तसेच पायी चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा 15 ऑक्टोबर हा सन्मानाचा दिवस आहे. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 'वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा होत असतो. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा त्यांच्या कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिवस असल्याची भावना स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे जेष्ठ सदस्य, कवठेकर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक डि. व्ही. कुळकर्णी यांनी व्यक्त केली. 
          पंढरपूर येथील जुन्या एस. टी स्टॅण्ड समोर ऊन, वारा पाऊसाची तमा न बाळगता उघड्यावर फुटपाथवर बसून तमाम पंढरपूरकरांना वेळेत वर्तमान पत्र पोहचविण्याचे काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा छोटेखानी सत्कार स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवर्य श्री. डि.व्हि.कुलकर्णी सर यांनी वृत्तपत्र विक्रेत्याला समाजात सन्मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करताना आजच्या वृत्तपत्र विक्रेता दिनाबद्दल आणि मिसाईल मॅन राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या स्मृतीला उजाळा देत त्यांनी वृत्तपत्र विक्रेता ते राष्ट्रपती असा प्रवास त्यांनी कसा केला यावर भाष्य केले. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे श्री. विलास कुलकर्णी, दत्तात्रय माने,अमित भादुले, विठ्ठल ऐतवाडकर , चंद्रकांत भागानगरे, गोपाळ तरळगट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
          
          यावेळी ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते संजय शिंदे, जयंत ताठे, सतिश लाड, सिद्धेश्वर सावंत, महेश पटवर्धन, राजाभाऊ तेंडुलकर, राजाभाऊ आवाडे यांचा हार, गुलाब पुष्प, शेला देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे महेश पटवर्धन, गोरख भिलारे, संतोष कुलकर्णी, विकास पवार, आनंद तेंडुलकर, उमेश नलवडे, महादेव वाघमोडे, संजय ताठे, बाळू जोशी, महादेव वाटाणे आदी वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form