(प्रकाश इंगोले)
डोंगरगाव (ता. मंगळवेढा)-:
स्वच्छता हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग असून स्वच्छता अभियान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव तथा भाजपचे ज्येष्ठ नेतेॲड.सुहास माळवे यांनी केले. ते रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी ग्रामपंचायत डोंगरगाव , भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सोलापूर व विविध सामाजिक संघटनाच्या वतीने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे होत्या. पूढे बोलताना अँड. माळवे म्हणाले की; माणसाचे आरोग्य हीच त्याची खरी संपत्ती असून केवळ गांधी जयंतीलाच हा स्वच्छता कार्यक्रम आयोजित न करता किमान महिन्यातून एकदा तरी गावात स्वच्छता अभियान राबवणे हे नागरिकांच्या हितावह असून प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून याची सुरुवात केली पाहिजे. यावेळी प्रथम पंचबेबी दर्गा परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डोंगरगाव व जिल्हा परिषद शाळा तसेच गावातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई करून स्वच्छता करण्यात आली.
यावेळी भाजपाचे संघटन सचिव शशिकांत चव्हाण. ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष विवेक खिलारे, सरचिटणीस बापू मेटकरी, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुदर्शन यादव, मंगळवेढा शहर अध्यक्ष सुशांत हजारे, किसान मोर्चाचे बापू डोंगरे दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे अध्यक्ष प्रा. डी. के. साखरे उपसरपंच प्रदीप चौगुले, ग्रामपंचायत सदस्य बाबा सय्यद, माजी सरपंच सचिन आकळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील व त्यांचा स्टाफ, डोंगरगाव उपकेंद्राच्या आरोग्य सेविका, आशा वर्कर व अर्धवेळ परिचर, संगम खडतरे, अमोल मेटकरी, विजय मेटकरी, सुभाष सलगर, मदन चौगुले, सागर चौगुले, निसार पठाण, सतीश मेटकरी, बाबा चौगुले, पिंटू भूसे, दत्ता लोहार, श्रेयश पाटील, रोहित नरळे, दादा खिलारे, तात्यासाहेब खिलारे, रमजान मणेरी, दादा माळी यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचा समारोप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा.डी.के. साखरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
Tags
सामाजिक वार्ता