मराठा आरक्षण उपोषणास स्थगिती तर आंदोलन सुरूच...

पंढरपूर प्रतिनिधी ----
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील युवक गणेश जाधव हा  सकल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवार दि. ८ ऑगस्ट पासून आमरण उपोषणास बसला आहे.आमरण उपोषण सुटले पण आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार या मराठा आंदोलन कर्त्या युवकाने केला आहे.तसेच त्यांनी साखळी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्हा येथील मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असतानाच उपोषण स्थळी
पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली तद्नंतर पंढरपूर येथे देखील आमरण उपोषणाला गणेश जाधव हा युवक बसला. गेल्या काही दिवसांपूर्वी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीचा विचार करून आमरण उपोषणास्थळी येऊन उपोषण सोडविले परंतु जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांची वेळ दिली व आंदोलन सुरू राहील असे  सांगितले .
  
याचप्रमाणे पंढरपूर येथे हि उपोषण स्थगित केले आहे. परंतु आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आणि या ४० दिवसांच्या कालावधीत सरकारने सकारात्मक विचार विनिमय करून मराठा आरक्षणाच्या बाबतीत योग्य व ठोस निर्णय घ्यावा नाहितर पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.आणि पुढील ४० दिवस साखळी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form