प्रशासन आणि शासनाच्या विरोधात जाऊन काम केल्याने मला तुरूंगवारी मिळाली.जनतेच्या दरबारात जाऊन
त्यांना विचारूनच या पुढच राजकारणाची दिशा ठरवणार -- माजी आमदार रमेश कदम
पंढरपूर प्रतिनिधी --
प्रशासन आणि शासनाच्या विरोधात जाऊन काम केल्यामुळे मला तुरुंग वारी मिळाली
असल्याची माहिती माजी आमदार रमेश कदम यांनी सांगितली. तसेच पुढील काळात आपण मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचे ते म्हणाले.माजी आमदार रमेश कदम हे पंढरपूर तालुक्यातील १७ गावांचा दौरा करणार आहेत. यावेळी त्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आणि जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट दूर व्हावे असे साकडे घातले आहे.
यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले अण्णाभाऊ साठे महामंडळाचे मी फक्त कर्ज वाटप केले होते. एकही रुपयाचा घोटाळा केला नाही. परंतु मी राज्य शासन आणि प्रशासनाच्या विरोधात जाऊन काम केले.त्यामुळे मला आठ वर्षे तुरुंगवारी भोगाव लागली. अद्यापही माझ्यावरआरोप सिद्ध झाले नाहीत, म्हणून मला उच्च न्यायालयाने जामीन दिला,असेही त्यांनी सांगितले.
यापुढील काळात आपण सर्वसामान्य जनतेसाठी मोहोळ तालुक्याच्या विकासा
साठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तरुण वर्ग माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली आहे; परंतु मी अद्यापही कोणता निर्णय घेतला नाही. जनतेच्या दरबारात जाऊन त्यांना विचारूनच या पुढचं राजकारण केले जाईल. सध्या मतदारसंघात गावभेटीचा दौरा असून प्रत्येक गावात जाऊन भेट घेऊन समस्या जाणून घेणार आहे.
अद्यापही मोहोळ तालुक्यातील पाणी आणि रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. आपण प्रत्येक गावाला रस्ता आणि पाणी देण्याची व्यवस्था केली होती.परंतु काही सत्ताधीशांना व विरोधीराजकारणाला हे पटले नाही. तसेच प्रशासनानेही मला काम व्यवस्थित करू दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
सध्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याबरोबर मी जेलमध्ये दीड वर्ष होतो.त्यांची जेलमध्ये तब्येत बिघडायची.परंतु बाहेर आल्यावर ते खणखणीत झाले आहेत.असेच राजकारणात होतं, दर आठ दिवसाला
त्यांची तब्येत बिघडायची आणि ते
रुग्णालयात उपचार घ्यायचे, तरी आपण
विकासाच्या कोणत्याही आड येणार नाही.
विद्यमान आमदार यशवंत माने हे चांगले काम करीत आहोत. आपण त्यांना सर्व ती मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Tags
राजकीय वार्ता