सातारा प्रतिनिधी ---
जालना येथे घडलेली घटना दुर्दैवीच आहे. त्या घटनेतील दोषींना माफ करता येणार नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे दोनच दिवसांत मराठा-कुणबी आरक्षणाचा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे संवेदनशील मनाचे व कृतिशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठ्यांना न्याय देतील, असा विश्वास शिवसेना धर्मवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले,जालना येथे घडलेली घटना दुर्दैवीच आहे. त्या घटनेतील दोषींना माफ करता येणार नाही. मुख्यमंत्री त्यांना माफ करणार नाहीत. मराठा समाजाने
अण्णासाहेब पाटील यांच्यासारखा योद्धा यापूर्वी गमावलेला आहे. आता मनोज
जरांगे-पाटील यांच्यासारखा लढवय्या
गमावणे मराठा समाजाला परवडणारे नाही. ते आम्हाला कायम हवे आहेत. मात्र,त्यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा. मुख्यमंत्री शिंदे हे वेळकाढू नाहीत. तसे असते तर त्यांनी दोनच दिवसांत मराठा- कुणबी आरक्षणाचा शासन निर्णय काढला नसता. दिलेल्या शब्दाला जागून दोनच दिवसांत शासन निर्णय काढणारे शिंदे हे पहिले मुख्यमंत्री असतील. त्यामुळे त्यांना वेळ देणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मराठा समाजाला अपेक्षित निर्णय मुख्यमंत्री शिंदे लवकरच घेतील, यात शंका नाही. तोपर्यंत आपण संयम बाळगून आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांना साथ देण्याची आवश्यक आहे.
Tags
राजकीय