सोलापूर जिल्हा माहिती अधिकारीपदी --सुनिल सोनटक्के



पंढरपूर --प्रतिनिधी 

सुनिल सोनटक्के यांनी घेतला सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार ते यापूर्वी जळगांव माहिती अधिकारी, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी, लातूर जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी  पदाचा अतिरिक्त पदभार तसेच लातूर व कोल्हापूर विभागाचा अतिरिक्त उपसंचालकाचा पदभार  यशस्वीपणे सांभाळला आहे.

त्यांची नुकतीच सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाच्या पदभार स्वीकारला आहे याबाबत सर्व स्तरातून त्यांचें स्वागत व अभिनंदन होत आहे  ,यावेळी सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयात वरिष्ठ लिपिक अविनाश गरगडे,  शरद नलावडे,  मिलिंद भिंगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी  लिपीक संजय घोडके, वाहनचालक भाऊसाहेब चोरमले, अनिल नलवडे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form