जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ मुरकुटे पुण्यस्मरण निमित्त विशेष लेख

आधुनिक मुबंईचे शिल्पकार --कै.जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ 
 मुंबई हि महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे. या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मुरकुटे हे कुटूंब व्यावसायासाठी मुंबईत आले. मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेत ते प्रगत होते. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा वापर समाजसुधारणेसाठी केला. जनकल्यानाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. स्वखर्चाने विविध समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले 

मुंबई शहरातील जनतेला पायाभूत सुविधाबरोबर आरोग्य-सुखसोयी मिळवण्यासाठी मुंबईसाठी स्वतंत्र म्युनिसपल आयोग नेमला त्याचे पुढे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये रूपांतर केले गेले नानांनी इंग्रजांच्या व राजा राममोहन रॉय याच्या साहाय्याने बालविवाह, सती या रूढी समाजाला ठिकठिकाणी व्याख्याने देऊन पटवून देण्याचे काम केले अंधश्रद्धा आणि ताठर धार्मिक चालीरितीवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली इंग्रजी राजवटीने घेऊन १८३० मध्ये इंग्रजांनी अंधश्रद्धेबरोबर जुन्या रुढोना आळा घालण्यासाठी सतीची चाल, बालविवाह या चाली कायद्याने बंद केल्या, तसेच विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी कायद्याने संरक्षण दिले. अशा तऱ्हेने बालविवाह, सतीची चाल या हिंदू धर्मातील अनिष्ट रुढीवर बंदी आणण्यात नानांचा मोलाचा वाटा होता.

मुंबई विद्यापिठाच्या स्थापनेतही नानांचा मोठा वाटा आहे. जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनास आणन्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत त्यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. नानांली आपल्या अधिकाराचा आणि संपत्तीचा सढळ हाताने वापर केला.

त्यांनी पुढे एलफिन्स्टन कॉलेज सुरू केले. सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'बोर्ड ऑफ एज्युकेशन' ची स्थापना  केली. त्याचे सदस्यत्व नानांना बहाल केले.
नाना मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. त्यामुळेच त्याना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. आचार्य अत्रे त्यांच्या विषयी म्हणतात कि, 'नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. 31 जुलै 1865 रोजी त्यांचे निधन झाले. शिक्षणाशिवाय लोंकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून एफिन्स्टन यांच्या मदतीने 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. या सोसायटीने मुंबईत व मुंबई बाहेर अनेक शाखा सुरू केल्या.

स्टुडंट लिटररी ॲण्ड सांयटिफिक सोसायटी च्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत केली. स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती. स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपल्या राहत्या घरी शाळा सुरू केली.

एकशेसाठ वर्षापूर्वी सामान्य माणसाला लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडीतून प्रवास करावा लागत असे नानांनी स्वतः १८४३ साली  आगगाडीची कल्पना प्रगतीपथावर नेण्याच्या ध्यासापायी ईस्टर्न कपनीची स्थापना केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडयात होते नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नामुळेच १६ एप्रिल १८५३ या दिवशी बोंरीबदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खडातील पहिली रेल्वेगाडी धावली.

 या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुण्यांचा व त्या रेल्वेमधून प्रवास करण्याचा मान इंग्रजांनी नानाना दिलाच, पण त्याशिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्याचा सन्मानदेखील केला तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना 'भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसटी) प्रवेशद्वाराजवळचा नाना शंकरशेट यांचा पुतळा त्याची साक्ष देतो. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form