विदर्भातील ४५० महिला भाविकांनी केले नदीचे पात्र, वाळवंट स्वच्छ
पंढरपूर(प्रतिनिधी)--
झाडू संतांचे मारग करू पंढरीचा स्वर्ग यासंत उक्ती प्रमाणे विदर्भातील ४५० महिला भाविकांनी नदीचे पात्र व वाळवंट स्वच्छ झाडून शेकडो टन कचरा गोळा केला . गुरुवार दि. ६ जुलै रोजी भ. प .नामदेव महाराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.सकाळी १२ वा. लाल रंगातील शेकडो महिला भाविक हातात झाडू, खराटे घेऊन परिसर स्वच्छ करण्यात आला
शिरपूर(जैन) ता.मालेगाव, जि. वाशिम येथील या महिला भाविक असून आषाढीवारीसाठी त्या पंढरपूर येथे वास्तव्यास आहेत. या महिलांनी संपूर्ण वाळवंट परिसर आणि नदीतील कपडे, जीर्ण व फुटलेल्या मूर्ती, देवी देवतांच्या तसबिरी काढून सफाई केली. ह. भ. प .नामदेव महाराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दिंडीप्रमुख रवी पुरी यांनी या स्वच्छता मोहीमेचे नियोजन केले होते.
यावेळी, रवी पुरी म्हणाले, आषाढी वारी झाल्यावर वाळवंट आणि नदी पात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा, कचरा, अस्वच्छता ,घान साठला होता. श्री विठ्ठलाची सेवा म्हणून आम्ही दरवर्षी असे कार्य करतो. आमचे वास्तव्य पंढरपूर येथे अजून पाच दिवस आहे. या काळात आम्ही श्री संत तुकाराम महाराज मठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री संत मुक्ताबाई मठ, श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा या ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम राबविणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.


