१०,००,००० मे. टन गाळप करण्याचे , मा. संचालक मंडळाचे उद्दीष्ट
वेणुनगर, पंढरपूर दि.१४
दि.१३.०६.२०२३ रोजी कारखाना कार्यस्थळावर श्री विठ्ठल सह.सा.का.लि., वेणूनगरच्या गळीत हंगाम २०२३ २४ ची पुर्वतयारी सुरु असून ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचे करार कारखान्यामार्फत करण्यात येत आहेत. ऊस तोडणी व वाहतूक कराराचे कामकाज चालू असून ट्रक / ट्रॅक्टर ५०० डपींग ५०० व बैलगाडी ३०० यंत्रणेसाठी अर्ज आलेले असून करार केलेले वाहन मालकांना पहिला हप्ता रु.२.०० लाख प्रति वाहन या प्रमाणे वाटप कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीत (आबा) पाटील यांचे शुभहस्ते व श्री बी.पी.रोगेसर तसेच व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोगे, ऊस तोडणी वाहतूक समितीचे सदस्य संचालक श्री दिनाकर चव्हाण, श्री नवनाथ नाईकनवरे, जनक भोसले, साहेबराव नागणे, कालिदास पाटील, प्रविण कोळेकर, कालिदास साळुंखे, सचिन वाघा, कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड, डी.व्ही. पी. पिपल मल्टीस्टेट शाखा वेणुनगर- गुरसाळेचे जनरल मॅनेजर श्री शशिकांत जगताप, मॅनेजर श्री महेश दांडगे, कारखान्याचे केन मैनेजर श्री सुनिल बंडगर, श्री धनाजी घाडगे इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत करणेत आले.
