खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे शुभहस्ते श्री विठ्ठल कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचा शुभारंभ व शेतकरी मेळाव्याचे आयोजन
पंढरपूर प्रतिनिधी-- (वेणुनगर)
श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा नव्याने सुरु होणाऱ्या बायो सीएनजी प्रकल्पाचा भूमीपुजन कार्यक्रम व शेतकरी मेळावा
रविवार दिनांक ०७.०५.२०२३ रोजी कारखाना कार्यस्थळावर आयोजित केला असून सदरचा कार्यक्रम भारताचे माजी कृषीमंत्री, अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, देशाचे जेष्ठ नेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे शुभहस्ते व खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, माजी आमदार दिलीप सोपल,आमदार बबनदादा शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, आमदार कैलास पाटील, आमदार संजयमामा शिंदे,आमदार यशवंत माने, आमदार संदिप क्षिरसागर, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुंखे, माजी आमदार दत्तात्रय सावंत सर, डॉ. बी. पी. शेंगेसर, श्री दिलीपबापू धोत्रे या
मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी २० ते २५ हजार शेतकरी-
सभासद उपस्थिती राहणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील यांनी
दिली. सदर कार्यक्रमास बहूसंख्य सभासद शेतकऱ्यांनी व हितचिंतकांनी अवश्य उपस्थित रहावे, असे
आवाहनही त्यांनी केले आहे.


