राजेंद्र कोरके पाटील यांची संघाच्या पश्चिम विभागीय कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

 


पंढरपूर --प्रतिनिधी 

पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल  तसेच संघटना बांधणीमध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पश्चिम विभागीय कार्याध्यक्ष पदी राजेंद्र कोरके पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पश्चिम विभागीय कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याचे संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी माहिती दिली आहे.संघटनेच्या ध्येय धोरणाच्या आधीन राहून आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबुत करण्याच्या दृष्टीने आपण सातत्याने  प्रयत्न करत आसता म्हणून निवड केली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या सुचनेनुसार निवड केली आहे.

    या निवडीने संघाच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला  यावेळी सचिन कुलकर्णी,नागेश अदापुरे, प्रवीण नागणे,शंकर कदम, विनोद पोतदार, राधेश बादले पाटील,मनोज पवार, कुमार कोरे, संजय यादव, संजय ननवरे, सुनील कोरके, रामदास नागटिळक, रवी कोळीआदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form