पंढरपूर मर्चंट बँक निवडणूक

 नागेश काका भोसले यांचे सहकार विकास पॅनलची प्रचार दौराला सभासदांचा उस्फूर्त प्रतिसाद



पंढरपूर ( प्रतिनिधी)

 दि पंढरपूर  मर्चंट को-ऑपरेटिव बँक या बँकेची पंचवार्षिक निवडणूक लागलेली असून या निवडणुकीसाठी येत्या रविवारी दिनांक 14 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये पंढरपूर मर्चंट बँक सहकार विकास पॅनल च्या वतीने नागेश काका भोसले, सोमनाथ डोंबे, आदित्य फतेपुर कर, अमरजीत पाटील,भगीरथ म्हमाने, व अन्य संचालक मंडळ या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत. तर विरोधी गटाकडून भारत भिंगे, राजेंद्र डोंबे ,भगवान भादुले धीरज म्हमाने ,दीपक शेटे, युवराज पाटील, किरण घाडगे व अन्य उमेदवार संचालक निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत.

     या निवडणुकीमध्ये गत पंचवार्षिक मधील संचालक मंडळ व त्यामधील संचालक हे एकमेकांच्या विरोधात उमेदवारी  जाहीर करून ही निवडणूक लढवली जात आहे. ही निवडणूक सुरुवातीच्या प्रचार दौऱ्याच्या वेळी चुरशीची निवडणूक होणार की काय असे वाटत होते, परंतु निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचार दौरा सुरू झाला. सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना असे वाटत होते की ही निवडणूक चुरशीची होणार की काय परंतु जसजसे मतदानाची तारीख जवळ येऊ लागले तसतसे नागेश काका भोसले यांचे पॅनल हे प्रचार दौऱ्यामध्ये प्रत्येक सभासदाच्या घराघरांमध्ये पोहोचू लागले. नागेश काका भोसले यांच्यासोबत त्यांचे संचालक उमेदवार हे एकजुटीने सर्व प्रचारद्वारे मध्ये पंढरपूर शहर टेंभुर्णी करकंब कुर्डवाडी आणि महूद या भागातील बँकेचे सभासदांना भेटू लागले जवळपास नागेश भोसले यांचे पॅनल चे उमेदवार प्रचार दौऱ्यामध्ये आघाडी असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे. तसेच  विरोधी गटाचे युवराज पाटील भगवान भादुले राजेंद्र डोंगरे शेटे अधिक संचालक मंडळाचे उमेदवार हे सर्व सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. या गटातील उमेदवार फोन द्वारे व्हाट्सअप फेसबुक द्वारे सभासदांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. या पंढरपूर बँकेचे सभासद हे पंढरपूर शहर मध्ये सात हजार च्या आसपास असे सभासद असून ग्रामीण भागामध्ये तीन सव्वा तीन हजार सभासद असून ग्रामीण भागातील सभासद हे हे वाड्यावर राहत असल्यामुळे या सभासदांपर्यंत ते पोहोचू सक्रिय चे दिसून येत नाही अशी माहिती समजते. दोन्ही विरोधी गटांमध्ये सभासदापर्यंत पोहोचण्याची जणू काही चुरस लागण्याची दिसत आहे या सभासदांपर्यंत पोहोचण्याच्या चुरशीमध्ये नागेश काका भोसले यांचे पॅनल चे उमेदवार हे सभासदांच्या पर्यंत पोहचल्याचे दिसून येत आहे.  त्यांच्या विरोधी गटातील लोक लोक हे स्वतः वैयक्तिक सभासदांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु प्रचाराचा अवधी कमी असल्यामुळे ते सभासदांपर्यंत पोहोचू शकत नसल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे.

   या पंढरपुराची बँकेच्या या निवडणुकीमध्ये नागेश भोसले यांच्या विरोधी गटातील उमेदवार हे एकटे एकटे प्रचार करीत असल्याचे सध्या शहरामधून दिसून येत आहे. शहरामध्ये सध्या अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे, की हे उमेदवार फक्त आपल्याला मत द्या अशी विनंती करीत असल्याचे ऐकण्यास मिळत आहे. अशा या प्रचार दौऱ्यामध्ये सद्यस्थितीमध्ये तरी नागेश काका भोसले यांचे पॅनल चे उमेदवार हे सर्व सभासदांच्या पर्यंत पोहचल्याचे दिसून येत आहे.

    एकूणच या निवडणुकीमध्ये नागेश काका भोसले यांचे सहकार पॅनलचे उमेदवार प्रचार दौऱ्यामध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येते. व विजयश्री खेचून आणणार की काय? असे चित्र सध्या पंढरपूर शहर व टेंभुर्णी करकंब महूद, कुर्डवाडी या भागामध्ये दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form