"माझा मर्चंट बँकेतील गैर कारभार विरोधकांनी दाखवून द्यावा मी निवडणुकीतून बाहेर पडतो"....... नागेश भोसले
पंढरपूर ( प्रतिनिधी)
पंढरपूर मर्चंट बँक च्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये नागेश भोसले आणि आपली मुलाखत देत असताना पत्रकारांसोबत बोलत असताना त्यांनी मर्चंट बँकेच्या चेअरमन पदावर बसल्यापासून आम्ही एकही गैर कारभार केलेला नाही. आम्ही गैर कारभार केला असेल तर त्वरित निवडणुकीच्या रिंगणांमधून बाहेर पडेन. उलट बँकेची आर्थिक परिस्थिती ही बिकट असताना मी चेअरमन पद स्वीकारले. त्यावेळी कित्येक लोकांच्यावर जुने थकीत कर्ज होते. हे जुने कर्ज वसूल होत नसल्याचे कारण सांगून हे थकीत कर्ज तुम्हीच वसूल करू शकता असे मला म्हटल्यामुळे मी हे पद स्वीकारून बँक ही सर्वसामान्य सभासद व व्यापारी यांचीही बँक आहे. बँकेच्या कर्जाची वसुली झाली तरच बँक प्रगतीपथावर येत असते. सभासदांकडील कर्ज मी सक्तीने वसूल केल्यामुळे काही लोक नाराज होऊन आज विरोधी गटाकडे जाऊन बसलेले आहेत. एक संचालक तर गेल्या पाच वर्षात संचालक असून देखील कधी बँकेकडे फिरकला देखील नाही. असे आज बँकेच्या निवडणुकीला उभे राहिलेले आहेत.
मर्चंट बँक राजकारणाचा अड्डा झाला आहे असेही विरोधक म्हणत आहेत त्यांनी दाखवून द्यावे. मी कधीही नगरपालिकेचे राजकारण कधी बँकेत आणलेलं नाही. असे खोटे आरोप करून विरोधक अपप्रचार करीत आहे. बँकेच्या ठेवी मध्ये शंभर कोटींच्या पुढे या ठेवी आपल्या बँकेमध्ये व्यापारी व सभासदांनी ठेवलेले आहेत. आमच्या कारभारावर विश्वास ठेवूनच या शंभर कोटीच्या पुढील ठेवी या सभासदांनी व्यापाऱ्यांनी ठेवलेले आहेत हे आणि चोख काम करत असल्याचेच चित्र आहे. विरोधक आमच्यावर टीका करीत असताना आम्ही व्यापारी नाही म्हणून असे आरोप केले जात आहेत. परंतु मी त्या विरोधकांना आवर्जून सांगू इच्छितो आमचा व्यवसाय हा आपल्या व्यापाराशी संलग्नच असा हा व्यवसाय आहे व्यापार आहे आम्ही ट्रकच्या व्यवसाय मधून आलेले अन्नधान्य या च व्यापाऱ्यांच्याकडे आम्ही वाहतुकीच्या रूपाने माल आणत असतो मग आम्ही व्यापारी नाहीत का. आम्ही व्यवसाय म्हणून दारूचा व्यवसाय करीत नाही किंवा अन्य व्यवसाय ज्या व्यवसायाचा उल्लेख पत्रकार परिषदेमध्ये घेऊ इच्छित नाही. असा तर आम्ही व्यवसाय करीत नाही हे विरोधकांनी जाणून घ्यावे.
आमच्या कारकिर्दीमध्ये सलग चार वर्ष सातत्याने सभासदांना लाभांश वाटप केलेला आहे. या बँकेची आर्थिक परिस्थिती ही सुधारलेली आहे की बिघडलेली आहे हे सुज्ञ जाणकार सभासद जाणून आहे. आम्ही बँकेच्या सभासदाच्या हितासाठीच प्रयत्न करीत आहोत आणि प्रयत्न करीत राहणार बँकेची प्रगती साठी आम्ही कटिबद्ध आहोत अन्य ठिकाणी बँकेच्या काही शाखा काढण्याचे आमचे नियोजन आहे. असे मनोगत बँकेचे उमेदवार नागेश काका भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

.jpg)