रायगडावर ३५० वर्षानंतर घुमणार किर्तनाचा आवाज

दि. १ जून रोजी होणार ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराजांचे किर्तन











सोलापूर (प्रतिनिधी) : 

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० व्या राज्याभिषेक सोहळा रायगड येथे साजरा केला जाणार असल्याची माहिती रायगड प्रतिष्ठान, निराळी वस्ती सोलापूरचे संस्थापक शिवाजी भोसले यांनी दिली.बुधवार दि.३१ मे रोजी दु १२.०० वा.दोन वाहने रायगडावर रवाना होणार आहेत वारकऱ्यांसाठी प्रवासात भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.गुरुवार दि. १ जून रोजी सायंकाळी ५.०० वा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांचे किर्तन होणार आहे.



शुक्रवार दि. २ जुन रोजी सकाळी ७.०० वा. रायगडावरून जगदीश्वराच्या मंदिराकडे पालखी निघते त्यावेळी वारकरी दिंडी निघणार आहे. सदरच्या दिंडीसाठी सोलापूरचे युवक नेते ज्ञानेश्वर सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. जे वारकरी रायगडावर आहेत त्यांचेकडे जाणार वारकरी पोशाख असणे गरजेचे आहे. त्या संबंधी सूचना व चर्चा करणेसाठी दि. २१ मे रोजी स.१०.०० वा. श्री संत मुक्ताई मंदिर राजेश कोठे नगर लक्ष्मी पेठ सोलापूर येथे बैठकीचे आयोजन केले आहे. 

    ज्यांना या कार्यक्रमाला उपस्थित रहावयाचे आहे त्यांनी दि. २० मे पर्यंत संपर्क साधावा व आपले नावं नंबर द्यावे. तसेच बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन रायगड प्रतिष्ठान निराळी वस्तीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी भोसले व विठ्ठल मोलाणे यांनी केले आहे. गोविंद ताटे मोबा. ९०७५५१६७८९, सचिन मोबा. ८६६९४२४६४५, जोतीराम चांगभले मोबा. ९८५०९६७१३९, बळीराम जांभळे ९४२२७८१९९९ यांचेशी संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form