पांचाळ सोनार समाज संघटनेच्या सामुदायिक मुंजीचा सोहळा संपन्न ....

सोहळ्यात ४१ बटुवर उपनयन संस्कार 



 संग्रामनगर दि.११ 

केदार लोहकरे यांजकडून 

अकलुज येथील पांचाळ सोनार समाज संघटनेच्या ६ व्या सामुदायिक व्रतबंध सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरा करण्यात आला असुन या सोहळ्यात ४१ बटुवर उपनयन संस्कार करण्यात आले. 


           शंकररनगर-अकलूज येथे कांतीलाल सांस्कृतिक भवनात बुधवारी सामुदायिक व्रतबंध (मुंजी) समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या सामुदायिक व्रतबंध सोहळ्यातील सहभागी ४१ बटुवर धार्मिक संस्काराने उपनयन संस्कार करण्यात आले.बटुंना आशिर्वाद देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील,सुवर्णपुष्प संस्था पुणे अध्यक्ष जगदीश महामुनी,शोभाताई महामुनी, प्रशांत दिक्षित,शशिकांत दिक्षित,संजय भास्करे,शामसुंदर धर्माधिकारी कोल्हापूर,कौलवकर बंधु कागल,मनोज पंडित धाराशिव,संतोष सोनार बीड,सतिश वेदपाठक,  राजाभाऊ दिक्षित (धारुर),प्सोरदिप दिक्षित औरंगाबाद सोलापुर जिल्हा पांचाळ सोनार समाज संस्थेचे माजी जिल्हाध्यक्ष पद्माकर दिक्षित,प्रशांत दिक्षित,मोहन वेदपाठक,सचिन महामुनी मोहोळ,कुर्डवाडीचे माजी नगराध्यक्ष राजेंद पारखे,संजय बानकर इंदापुर, अमोल महामुनी जेऊर, प्रशांत पळसे व पद्माकर धर्माधिकारी बारामती यांच्यासह राज्यभरातील समाजाचे पदाधिकारी, समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       प्रारंभी कार्यक्रमाचे पौरोहित्य सनद महामुनी व त्याच्या सहक-यांनी करुन सहभागी बटुवर  उपनयन संस्कार करुन कार्यक्रम स्तरापासून मारुती मंदिरापर्यंत बटुंची शोभायात्रेत काढण्यात आली.उपस्थित मान्यवरांनी बंटुवर अक्षता टाकुन आशिर्वाद दिले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष राजीव लोहकरे,उपाध्यक्ष सुभाष पोतदार,खजिनदार हर्षद लोहकरे,सचिव प्रकाश कामेगांवकर,कार्याध्यक्ष बालाजी दिक्षित,सदस्य संजय पोतदार,अनिल पोतदार,बाळासाहेब वेदपाठकअरुण क्षिरसागर,रंगनाथ पोतदार,अमित लोहकरे,रविंद्र भास्करे, सोमनाथ जडे,प्रशांत भास्करे,सागर महामुनी,नागेश वेदपाठक,निरंजन पंडित,आकाश तुळजापुरकर,महिला प्रतिनिधी अनुराधा लोहकरे,स्नेहल भास्करे,प्रशाली लोहकरे,कोमल महामुनी,दिपाली पोतदार,नम्रता वेदपाठक,मुग्धा पोतदार,उर्मिला पोतदार,शुभांगी पोतदार,धनश्री लोहकरे,आरती जडे,माधवी कामेगांवकर,दिपाली पंडित,राजश्री महामुनी, भक्ती महामुनी,योगिता जडे यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form