पंढरपूर येथे शिव बसव जयंती निमित्त विविध कार्यक्रम

 



पंढरपूर प्रतिनिधी--

 शिव बसव जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी  शिव बसव जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या  हस्ते करण्यात आले.तर राज्य स्तरीय नृत्य स्पर्धा व होम मिनिस्टर स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूर येथील भोसले चौक येथील नगरसेविका करुणाताई आंबरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.                              

 याप्रसंगी विठ्ठल अभियांत्रिकीचे सर्वा सर्वे बीपी रोंगे सर, निलेश आंबरे, प्राचार्य तुकाराम मस्के सर, राजेंद्र फुगारे आदी मान्यवर मंडळीउपस्थित होते.           

तर होम मिनिस्टर कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधनाताई भोसले, उपनगराध्यक्क्षा श्वेता ताई डोंबे, नगरसेविका रेणुका ताई घोडके, नगरसेविका दर्शना ताई शिंदे ,अभ्यंकर, शुभांगी ताई भुईटे आदी महिला मान्यवर मंडळी उपस्थित होते 

या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील नृत्य स्पर्धकांनी स्पर्धेत मोठ्या प्रमाणे भाग घेतला होता तर होम मिनिस्टर कार्यक्रमात पंढरपुरातील अनेक महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form