शक्ती प्रदर्शन करत अभिजित पाटील पॅनलच्या उमेदवारांनी केले अर्ज दाखल
पंढरपूर प्रतिनीधी---
गेल्या अनेक हंगामापासून चंद्रभागेतील शेतकरी सभासदांना वेळेवर व योग्य प्रमाणात ऊसाचा भाव मिळत नाही . यामुळे सभासदा मधून वेळोवेळी संताप व्यक्त करण्याच्या घटना घडलेल्या आहेत या सभासदांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून जर सभासदांनी आपल्या बाजूने कौल दिल्यास चंद्रभागेच्या सभासदांनाही विठ्ठल प्रमाणेच योग्य दर देऊ व वेळेवर उसाचे बिल देऊ असे आश्वासन अभिजित पाटील यांनी दिले .
मोठ्या शक्ती प्रदर्शनाने अभिजित पाटील यांनी आपल्या पॅनल मधील सहकारी उमेदवाराचे अर्ज दाखल केले . युवा शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की,कारखान्याचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी सत्तेचा गैरवापर करत सभासद व कामगारावर अन्यय केले आहे जिल्ह्यातील इतर कारखान्यापेक्षा कमी दर देणे तसेच वेळेवर ऊसाचे बिल न देणे कारखाना अडचणीत असल्याचे कारण देत ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार यांची देणी देण्यास विलंब करणे अशा विविध कारणांमुळे शेतकरी सभासद नाराज आहेत. ज्या प्रमाणे आपण विठ्ठल कारखाना बंद असलेला कारखाना सुरू करून शेतकरी सभासद यांना न्याय दिला तसेच हा कारखाना सुरू असुन देखील योग्य पद्धतीने न चालवल्याने अडचणीत आला आहे .
विठ्ठल परिवारातील जेष्ठ सदस्यांच्या या कारखान्यात विठ्ठल परिवारातील एकाही नेत्याला सभासद व सदस्य केले नाहीत उलट खाजगी कारखाना असल्या सारखे वागणूक दिली जाते. आज सभासदांनी योग्य भुमिका घेतली तरी परिवर्तन घडवून आणू आणि सहकार शिरोमणी कारखान्यास गत वैभव प्राप्त करून देऊ असे आश्वासन अभिजित पाटील यांनी दिले. विरोधकांना बरोबर घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे. कारखान्यातील भ्रष्ट कारभार संचालक मंडळ चेअरमन यांनी लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवावी सभासद शेतकरी यांना सहकार्य करावे निवडणुकीसाठी लागणारे कायदेशीर कागदपत्राची पूर्तता करून विद्यमान संचालक मंडळाने निवडणूक लढवू पाहणाऱ्या शेतकरी सभासदांना सहकार्य करावे नाही तर जशास तसे उत्तर देऊ असा निर्वाणीचा इशारा अभिजीत पाटील यांनी दिला आहे.


