सोलापूर राष्ट्रवादी युवकांचे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं

 भारतीय कुस्ती पटूंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक आणि क्रिडा प्रेमीचे एकवटले 



पंढरपूर --प्रतिनिधी 
भारत देशाला कुस्तीमध्ये विविध मेडल घेवून देणारे व भारत देशाचे नाव उज्वल करणारे विनेश फोगट, साक्षी मलिक, संगीता फोगट, बजरंग पूनिया हे गेल्या महिनाभरापासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे लैंगिक शोषण विरोधात आंदोलन सुरू आहे, दरम्यान चार दिवसांपूर्वी दिल्ली येथील नविन संसदेसमोर आंदोलन सुरू असताना भारतीय महिला कुस्ती पटूना  पोलिसांनी फरफटत नेत ताब्यात घेत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, दरम्यान यावेळी भारतीय महिला कुस्ती पटूंना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळाली, यावेळी पोलिसांनी झटापट करून महिला कुस्ती पटूंना ताब्यात घेतले. या घटनेमुळे संपूर्ण देशात तिव्र पडसाद उमटले यांची दखल युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) या आंतरराष्ट्रिय संघटनेने घेतली आहे, यामुळे देशाची बदनामी मोठ्या प्रमाणात होत आहे यासाठी देशभरात केंद्र सरकार विरोधात आंदोलने सुरू झाली. 



    याची दखल देश भरातील क्रीडा प्रेमीसह सर्वच क्षेत्रातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे, सोलापूरात देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व क्रीडा प्रेमींनी एकत्रित येत रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळा येथे काळ्या फिती बांधून घटनेचा मूक निदर्शने करत निषेध केला,  आणि भारतीय महिला कुस्ती पटूंना आपला पाठींबा दिला.दरम्यान आंदोलकांनी या घटनेबाबत आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या साक्षी मलिक, विनेश फोगट, संगीता फोगट यांचे फोटो असलेले फलक हातात धरून तसेच भारत देशाचा झेंडा घेवून समर्थन देण्यात आले .

यावेळीपैलवान प्रभाकर काशीद, पैलवान गोपीनाथ घोडके, पैलवान सनी देवकते, पैलवान मनोज घोडके, पैलवान अमोल पाटील, पैलवान राहुल सरवदे, पैलवान सिद्धू बचूटे, चंद्रकांत पवार, चेतन गायकवाड, मुसा अत्तार, महेश कुलकर्णी, सरफराज शेख, इरफान शेख, संपन्न दिवाकर, सचिन गायकवाड, सागर भोसले, अक्षय जाधव, अमित सुरवसे, सचिन खंडागळे, शरद येच्चे, किरण शिंदे, मकरंद शिवशेट्टी प्रथमेश गवळी, तलहा शेख सरयांच्यसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form