करकंब येथील अद्विता शिंदे-बामने हिचे स्पर्धा परीक्षेत उज्वल यश.

करकंब सह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव...!



आई वडिल.. शिक्षकांचे संस्कार... पती सासू -सासऱ्याची मोलाची साथ..... स्पर्धा परीक्षेत यश मिळवून स्वप्न केले साकार.....!

करकंब प्रतिनिधी:-

बालपणापासूनच आई-वडिलांचे.. शिक्षण घेत असताना ..शिक्षकांचे ..संस्कार अंगीकारत.... विवाह झाल्यानंतर पती आणि सासू-सासर्‍यांची मोलाची साथ.. शिक्षणाविषयी असलेली आवड आणि जिद्द या सर्वावर मात करून करकंब येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून असलेले मोहन जोतीराम शिंदे यांची कन्या -अद्विता शिंदे हिने एक नाही तर तब्बल तीन स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले असून तिच्या या यशाबद्दल करकंबसह व परिसरातून सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

    वडील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात मध्ये वाहक या पदावर काम करत  असून तर  आई गृहिणी आहे.

माहेर व सासरच्यांची शिक्षणासाठी मोलाची साथ मिळाल्याने

माझे पती आई-वडिल, सासू-सासरे, सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे मी या स्पर्धेत घवघवीयश मिळवले असल्याची प्रतिक्रिया -अद्विता शिंदे-बामने हिने व्यक्त केली.

अद्विता शिंदे बामने हिचे चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मुलींची शाळा करकंब.येथे पूर्ण झाले.

दहावी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, करकंब .तर अकरावी -बारावी  , कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे शिक्षण  झाले आहे.BE - ENTC गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कराड येथे 2015 ला झाले.2016 मध्ये IBPS RRB मध्ये निवड झाली.  पण जॉईन केले नसल्याचे सांगितले.

2019 ला MPSC वनसेवा- RFO मधून या पदी निवड झाली होती.

MPSC राज्यसेवा- 2020 मधून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदी निवड झाली.

सध्या सहाय्यक निबंधक या पदावर ट्रेनिंग घेत आहे. वनामती, नागपूर येथील ट्रेनिंग पूर्ण झाले आहे. आणि जिल्हा संलग्नतेसाठी नाशिक या जिल्ह्यामध्ये सहाय्यक निबंधक म्हणून ट्रेनिंग घेत आहे.

MPSC राज्यसेवा- 2021 ची मेरिट लिस्ट 28 फेब्रुवारीला जाहीर झाली. मेरिट लिस्ट SC मध्ये द्वितीय क्रमांकावर आहे.

लवकरच अंतिम निकाल जाहीर होईल.आणि पोलीस उपअधीक्षक या पदावर माझी निवड निश्चितपणे होईल .असे मत अद्विता शिंदे- बामने यावेळी व्यक्त केले .

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु करावी. तसेच जिद्द व चिकाटी ....आई -वडील आणि शिक्षकांचे संस्कार... व सर्वांची साथ असेल तर  काहीही अशक्य नाही. कोणत्याही स्पर्धेत व परीक्षेत यश निश्चितच मिळते.असे यावेळी अद्विता शिंदे -बामने सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form