२९ एप्रिल २०२३ रोजी लक्ष्मणशक्ती मुक्तोत्सव सोहळा होणार

 




लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे मिती वैशाख शुद्ध ९ शके १९४५ शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी लक्ष्मणशक्ती मुक्तोत्सव सोहळा होणार आहे.
     या लक्ष्मणशक्ती सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ग्रंथ वाचन होणार असुन रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी सूर्योदयापुर्वी लक्ष्मणशक्ती मुक्त होणार आहे. यानंतर आरती व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. 
    या लक्ष्मणशक्ती सोहळ्यानिमित्त वाचक व सुचक यांना मोफत राहण्याची व जेवणाची व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली आहे.  या लक्ष्मणशक्ती सोहळ्याचे ठिकाण श्री विठ्ठल मंदिर लक्ष्मी दहिवडी असणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी या लक्ष्मणशक्ती सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त  रामभक्त व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form