आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल अशी माहिती माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंढरपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात १ नोव्हेंबर २००५ ही कट ऑफ डेट ठरवून अगोदरच्या नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी मन्शन योजना दिली आहे. परंतु फक्त शालेय शिक्षण विभागांतर्गत खासगी व्यस्थापनातील शाळामधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देत असताना आलीकडील काळात अडथळे निर्माण केले आहेत. अनेक शिक्षक बिगर पेन्शनचे निवृत्त झाले आहेत. येणाऱ्या ५- ६ वर्षात ९० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियतवयोमानानुसार निवृत्त होणार आहेत. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने उपस्थित केलेल्या मुद्यांचा अभ्यास करावा व ३० एप्रिल २०२३ पर्यंत सरकार म्हणून कट ऑफ डेट १ नोव्हेंबर २००५ अगोदरच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जाहीर करावी अन्यथा ३ मे २०२३ पासून
आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल अशी माहिती माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
३१ मार्च २०२३ च्या शासन आदेशाने १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या अनुशंगाने काही लाभ मिळाले आहेत. राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने उपस्थित केलेल्या मुद्यांच्या विचार करता १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना नैसर्गिक न्यायाने जुनी पेन्शन मिळण्याचा हक्क असल्याचे दत्तात्रय सावंत यांनी सांगितले. यावेळी शिक्षक पतसंस्था बाळेचे चेअरमन समाधान घाडगे, शाळा कृती समितीचे पुणे विभाग संपर्क प्रमुख राजेंद्र असबे, जिल्हा कार्याध्यक्ष मारूती गायकवाड, सोलापूर संपर्कप्रमुख कुलदीप पवार, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
