या कार्यक्रमासाठी सोलापुरचे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी समाधान गुटुकुडे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते तर माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. वोहरा, मुंबई पोलिस दलातील अधिकारी अनंत कांबळे आणि सामजिक कार्यकर्त्या सौ. महेंद्रकर यांची अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती
पंढरपूर --प्रतिनिधी
दिनांक ३ फेब्रुवारी २०२३रोजी
एमआयटी विश्वशांती गुरूकूल पंढरपूर येथे वार्षिक क्रिडा दिनानिमित्त विविध क्रिडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पाहुण्यांच्या हस्ते क्रिडाज्योत पेटवून क्रिडादिनाचे उद्घाटन करण्यात आले. योगासने आणि मल्लखांब यांच्या चित्तथराक प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांनी शारिरिक लवचिकता आणि संतुलन यांचे प्रदर्शन केले तर सांघिक कवायत, जिम्नॅस्टिक इत्यादी क्रिडाप्रकारांनी प्रेक्षक आणि पाहुण्यांची मने जिंकलीक्रिडादिनानिमित्त पालकांनी देखील धावणे आणि रस्सीखेच स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त्पणे सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी सोलापुरचे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी समाधान गुटुकुडे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते तर माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. वोहरा, मुंबई पोलिस दलातील अधिकारी अनंत कांबळे आणि सामजिक कार्यकर्त्या सौ. महेंद्रकर यांची अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती.
प्रमुख अतिथी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांच्या हस्ते बक्षिस वितरणाने क्रिडा दिनाची सांगता झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांनी विद्यार्थी दशेमध्ये चांगल्या संगतीचे महत्व समजावून सांगितले.शाळेचे वरिष्ठ प्राचार्य अपु डे, प्राचार्य शिवाजी गवळी, प्राचार्या कार्तिश्वरी चेट्टीयार तसेच सर्च शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी क्रिडादिवस यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.