मनसे विद्यार्थी महासंपर्क अभियान निमित्त अमित ठाकरे पंढरपूरात येणार

अमित ठाकरे 3 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेणार पंढरपूर,   मंगळवेढा आणि सोलापुरात विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भेटणार 


पंढरपूर --प्रतिनिधी 
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे  विद्यार्थी महासंपर्क अभियान अंतर्गत 2 फेब्रुवारी रोजी रात्री पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी येणार असून 3 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेणार आहेत. 
    त्यानंतर मंगळवेढा येथील मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता  त्यांचे हस्ते करण्यात येणार आहे. मंगळवेढा येथून सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 11वाजता येणार आहेत .सकाळी 11 ते 2 ते  प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी सवांद साधणार आहेत.त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सर्व  मनसे पदाधिकारी यांची बैठक घेणार आहोत. 
त्यानंतर श्री सिद्धरामेश्वर चे दर्शन घेऊन सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालय येथे मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात येणार. सायंकाळी 5 वाजता मोडनिंब  येथे शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हा दौरा विद्यार्थी  केंद्र बिंदू  ठेऊन करण्यात येणार आहे. ते सर्व विद्यर्थ्यांशी सवांद साधणार आहेत. सोलापूर जिल्हा मनसेच्या वतीने विविध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी इत्यादी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form