ऑनलाइन नाव नोंदणी २९ जानेवारी व ऑफलाइन नावनोंदणीची मुदत दिनांक ३१ जानेवारी २०२३ पर्यंत वाढविण्यात आलेली असून खास शालेय विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपयांची सवलत
पंढरपूर- प्रतिनिधी
येथील रनर्स असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना 300 रुपयाची सवलत देण्यात आली आहे.
रनर्स असोसिएशन पंढरपूर यांच्या वतीने आयोजित रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३रोजी संपन्न होणाऱ्या राज ज्वेलर्स पंढरपूर हाफ मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याकरिता २६ जानेवारी २०२३ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक होते परंतु पंढरपूर शालेय विद्यार्थी व क्रीडाशिक्षक यांच्या आग्रहास्तव ऑनलाइन नाव नोंदणी २९ जानेवारी व ऑफलाइन नावनोंदणीची मुदत दिनांक ३१ जानेवारी २०२३ पर्यंत वाढविण्यात आलेली असून खास शालेय विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपयांची सवलत देखील देण्यात आलेली आहे या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रनर्स असोसिएशन पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आलेले आहे तसेच ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.०० या वेळेत आपले टी-शर्ट किट संपादित करताना आधारकार्ड सोबत आणावे असे आवाहन करण्यात आले आहे.