पंढरपूर स्वयंसिद्धा महिला मंडळ रौप्य महोत्सवी वर्ष उत्साहात साजरा

 आपण ज्या समाजाचे देणे लागतो त्या समाजाची उतराई होण्यासाठी विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपणे या हेतूने प्रेरित होऊन या संस्थेने कार्य केले आहे 
पंढरपूर --प्रतिनिधी 
 स्वयंसिद्धा महिलामंडळाची स्थापना ही १९९७ साली करण्यात आली होती. महिलांनी घरकामातून बाहेर पडून आपण ज्या समाजाचे देणे लागतो त्या समाजाची उतराई होण्यासाठी विविध उपक्रमातून बांधिलकी जपणे असा होता.आणि आज बघता बघता स्वयंसिद्धा महिला मंडळाला २५ वर्षे पूर्ण झाली.
      दरवर्षी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांचे सदस्य हे विविध सण, स्पर्धा धार्मिक शिबिर आयोजन करत असतात.दर महिन्याला एकञ येऊन पुढील कार्यक्रमांची रुपरेखा आखली जाते. यामध्ये प्रत्येक महिला सदस्य हिरहिरीने भाग घेवून सहभाग नोंदवत असतात.
      या रौप्यमहोत्सवी वर्षात सौ रुपाली दोशी यांची अध्यक्षपदी,सौ दिप्ती गांधी यांची उपाध्यक्षपदी,सौ अनुजा गांधी खजिनदारपदी तर सौ नम्रता गांधी, सौ प्रणिता गांधी यांची कार्यकारणीमध्ये निवड झाली आहे .
  स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौ रुपाली दोशी यांनी मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक आणि सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form