विद्यार्थ्यांच्या उज्वल प्रगतीसाठी विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच संस्काराचे बीज रुजवावे व आपला देश आदर्श व सशक्त घडवावा --राजेंंद्र मानेे
पंढरपूर --प्रतिनिधी
श्री रुक्मिणी विदयापीठ संचलित अक्षरनंदन प्राथमिक विदयामंदीर इसबावी येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेच्या सचिवा आदरणीय सौ. सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रशालेत प्रजासत्ताक दिन निमित्त राजेंद्र माने साहेब निवृत्त उपअधिक्षक महावितरण सोलापूर तसेच सचिव नवचैतन्य जेष्ठ नागरिक संघ इसबावी यांच्या शुभ हस्ते प्रशालेत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक देशाविषयी आपली मते व भाषणातून व्यक्त केली.
सदर कार्यक्रमासामध्ये प्रशालेचे पालक चद्रकांत वाघ यांच्या वतीने गरीब विदयार्थ्यांना स्कूल बँग,खाऊ वाटप करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्रमुख पाहुणे राजेंद्र माने यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल प्रगतीसाठी विद्यार्थ्यांमध्ये
लहानपणापासूनच संस्काराचे बीज रुजवावे व आपला देश आदर्श व सशक्त घडवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बहुसंख्य पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक काशिनाथ गोगीव होते तर सुत्रसंचलन सुसेन गरड यांनी केले तर मनोगत दिगंबर देवकर यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. राणी गावडे सौ. रुपाली भोईटे सो जस्मीन बागवान सौ अर्चना पवार यांनी परिश्रम घेतले. सुसेन गरड यांनी आभार मानले. यावेळी शिंदे पालक यांनी लेझीम भेट वस्तू दिल्या.