जिल्हाध्यक्ष पांडेकर भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून ,सर्वात महत्त्वाची म्हणजे कोर कमिटी स्थापना करण्यात आलेली आहे.
पंढरपूर --प्रतिनिधी
आज पंढरपूर तालुका तलाठी संघटनेची बैठक श्रीकृष्ण हॉटेल येथे संपन्न झाली, सदर बैठकीमध्ये पंढरपूर तालुका तलाठी संघटनेची जुनी संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष पांडेकर भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून सदर निवडीमध्ये खालील प्रमाणे नवीन कार्यकारणीची निवड बहुमताने करण्यात आली असे ते म्हणाले
पंढरपूर तलाठी संघटनेचे अध्यक्ष म्हणून समाधान शिंदे यांची निवड करण्यात आली.तसेच कार्याध्यक्ष म्हणून प्रशांत शिंदे यांची निवड करण्यात आली.सरचिटणीस म्हणून प्रकाश भिंगारे यांची निवडकरण्यात आली.उपाध्यक्ष म्हणून आप्पासाहेब काळेल व महिला उपाध्यक्ष म्हणून नाईक मॅडम, सहसचिव म्हणून गणेश तिके भाऊसाहेब, खजिनदार म्हणून बी ए गोरे भाऊसाहेब, यांची निवड करण्यात आली.
तसेच संघटनेमध्ये हिशोब तपासणीस, संघटक, सल्लागार, कोषाध्यक्ष, निमंत्रित सदस्य व सर्वात महत्त्वाची म्हणजे कोर कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे.
सदर सभेसाठी पंढरपूर तालुक्यातील बहुसंख्य तलाठी , मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व सोलापूर जिल्हा चे जिल्हाध्यक्ष पांडेकर भाऊसाहेब व इतर पदाधिकारी हजर होते. यांच्या समक्ष सदरची निवड करण्यात आलेली आहे