आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट ही डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट
ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून कार्य करणारी संस्था आहे,भारतीय सैन्य दलासाठी आवश्यक असणारे तंञज्ञान विकसित करण्यासाठी हि संस्था कार्यरत आहे.
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात कार्यरत असलेले डाॅ. स्वानंद कुलकर्णी व प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सादर केलेल्या संशोधन प्रस्तावास "डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन" कडून संशोधन निधी प्राप्त झाला असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट ही डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून कार्य करणारी संस्था आहे. भारतीय सैन्य दलासाठी आवश्यक असणारे तंञज्ञान विकसित करण्यासाठी हि संस्था कार्यरत आहे.
एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयामध्ये मटेरीयल सायन्स व इंजिनिअरींग क्षेत्रामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल व जनरल सायन्स विभागामधून संशोधक कार्यरत आहेत. सिंहगड महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या संधी मिळालेल्या व पीएच.डी धारक प्राध्यापक विविध संशोधन क्षेत्रात काम करीत असतात.
महाविद्यालयाच्या माध्यमातून संशोधनास सहाय्य करणाऱ्या विविध संस्थांना संशोधन निधी साठी प्रस्ताव देण्याची पद्धत महाविद्यालयाच्या संशोधकांकडून राबवली जाते.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून ए आर डी ई या संस्थेस काही प्रस्ताव पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाच्या माध्यमातून सादर करण्यात आले होते.
यामध्ये ॲल्युमिनियमचा मिश्र धातु निर्माण करण्यासाठी व त्याच्या मुलभुत गुणांमध्ये, झीज , टिकाऊपणा, गंजविरोध क्षमता व इतर गुणधर्म यांच्यावरील परीणाम पाहण्यासाठी संशोधन करण्याचा प्रस्ताव पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी व मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सादर केला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाली असुन यामाध्यमातून देशासाठी काहीतरी काम करण्याची संधी प्राप्त झाल्याने महाविद्यालयाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संशोधन प्रस्तावास निधी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. संपत देशमुख, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डॉ. समीर कटेकर, डाॅ. श्रीगणेश कदम, डाॅ. राजेंद्र पाटील, प्रा. अनिल निकम सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी डाॅ. स्वानंद कुलकर्णी व प्रा. अतुल कुलकर्णी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.