संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य.राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्कार २०२२ या पुरस्काराचे आयोजन शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी करण्यात आले .
पंढरपूर --
संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य.राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्कार २०२२ या पुरस्काराचे आयोजन शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून श्री धनंजय उर्फ मुन्ना महाडिकसो. संसद रत्न खासदार राज्यसभा दिल्ली. आणि श्री भूषणसिंह राजे होळकरसो, पंढरपूरचे युवा पत्रकार लखनजी साळुंखे यांनी आपल्या प्रिंट मीडिया न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय,आर्थिक,तसेच सर्व स्तरातील बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक कार्य केले आहे. काही वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे लखन साळुंखे हे सामाजिक राजकीय याचे भान असलेले पत्रकार असून यांनी आत्तापर्यंत आपल्या लेखणी द्वारे समाजातील विविध घटकातील समस्यावर लिखाण करून न्याय देण्याचा प्रयत्न केला करत आहेत अशा तरुण पत्रकार्याच्या कार्याची दखल घेऊन या संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली
लखन साळुंखे यांनी पंढरपुरातील विविध प्रश्नांवर आपल्या लेखणी द्वारे वस्तुनिष्ठ लिखाण करून सामाजिक कार्यास न्याय देण्याचा प्रयत्न केला अशा या तरुण पत्रकाराचा गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने होत आहे हे अभिमानाची गोष्ट आहे शाहू महाराज दसरा चौक येथे दोन डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साळुंखे यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले
त्याने आत्तापर्यंत पत्रकारिता क्षेत्रात विविध प्रकारचे लेखन करून व सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेऊन केलेल्या कार्याची दखल वरील संस्थेने घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला लखन साळुंखे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन सुदर्शन खंदारे नंदकुमार देशपांडे राहुल सरवदे यांनी केले आहे.