संस्थेला व्यापक स्वरूप आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक- डाॅ. दत्तात्रय बाळसराफ

अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था हि एकमेव संस्था असुन या संस्थचे काम उत्कृष्ट असुन चांदा ते बांधा पर्यंत संस्थेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक
अरण: प्रमोद बनसोडे
शिक्षणासाठी माळी समाजातील विद्यार्थ्यांना परतफेडीची कर्जाऊ शिष्यवृत्ती देणारी व समाज प्रबोधन करणारी अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था हि एकमेव संस्था असुन या संस्थचे काम उत्कृष्ट असुन चांदा ते बांधा पर्यंत संस्थेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. समाज प्रबोधनाच्या दृष्टीकोनातून माळी समाजातील उच्च शिक्षित होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना या संस्थेच्या माध्यमातून परतफेड शिष्यवृत्ती देणाऱ्या या संस्थचे व्यापक स्वरूप आणण्यसाठी समाजातील सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचे तज्ञ विश्वस्त डाॅ. बाळसराफ यांनी अरण येथील सभेत बोलताना व्यक्त केले.
     अरण (ता. माढा) येथे रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यकारी सभा व समाज बांधव मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची सुरवात मान्यवरांच्या हस्ते श्री संत सावता महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
     या मेळाव्यात संस्थेच्या  वार्षिक विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा व ठरवा संमत करण्यात आले. भविष्यातील संस्थेची वाटचाल, संघटन व प्रबोधन याविषयावर सर्वांगीण चर्चा करण्यात आली.
   या कार्यक्रमात सहभागी मान्यवरांचा संस्थेच्यावतीने शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
   
     या कार्यक्रमास पद्माकांत कुदळे, चेअरमन डाॅ. प्रभाकर माळी, उद्योजक गोविंद माळी, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे युवक कार्याध्यक्ष सोमनाथ राऊत, गणेश माळी, तज्ञ विश्वस्त डाॅ. दत्तात्रय बाळसराफ, डाॅ. स्नेहल बाळसराफ, मधुकर माळी, दत्तात्रय घाडगे, मॅनेजिंग डायरेक्टर रंजभाऊ गिरमे, अध्यक्ष दिलीप राऊत, विजय लोणकर, अँड. गोविंद बादाडे, धिरज कुदळे आदींसह अनेक संस्थचे पदाधिकारी व माळी समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशांत एकतपुरे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form