रत्नाई कृषी महाविद्यालया तर्फे शेतकऱ्यांना कंपोस्ट खत तयार करण्याचे मार्गदर्शन

अतिरिक्त रासायनिक खत वापरामुळे जमिनीवर होणारे विपरित परिणाम तसेच जमिनीचा कस टिकवण्यासाठी कंपोस्ट खताचे महत्त्व व प्रात्याक्षिक करून माहिती दिली.
खंडाळी (वार्ताहर )-
विझोरी ता. माळशिरस येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषीकन्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम 2022- 23 अंतर्गत शेतकऱ्यांना कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, रत्नाई कृषी  महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक) व कार्यक्रमाधिकारी प्रा. एस.आर.आडत यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीकन्या काजल भोसले, प्रतिभा डांगे, नाज आतार, वैष्णवी बर्वे, श्रुती काळे, मनिषा दगडे, रत्नप्रभा धाईजे, यांच्याकडून शेतकऱ्यांना कंपोस्ट खत तयार करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. 
अतिरिक्त रासायनिक खत वापरामुळे जमिनीवर होणारे विपरित परिणाम तसेच जमिनीचा कस टिकवण्यासाठी कंपोस्ट खताचे महत्त्व सांगण्यात आले. हे प्रात्यक्षिक भजनदास शंकर इंगळे यांच्या घरी घेण्यात आले व यावेळी तानाजी इंगळे, अमोल काळे, धनाजी काळे, आबासाहेब बोरकर, शंकर काळे व इतर शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form