मंगळवेढा तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीवर 'समविचारी' चाच झेंडा

आ. समाधान आवताडे यांच्या गटाने भारत भालके गटाबरोबर युती केली, तर भालके गट काही ठिकाणी परिचारक गटाबरोबर एकत्र , मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या गटाबरोबर गावगाड्यातील सत्तेसाठी नवा समविचार या निवडणुकीच्या निमित्ताने रुजवण्यात आला
मंगळवेढा-(नारायण मानेे) 
मंगळवेढा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आज शासकीय गोदामात तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या नेतृत्वाखाली झाली. पहिल्या फेरीमध्ये येड्राव, गोणेवाडी, तळसंगी, शिरनांदगी, पाटकळ, गुंजेगाव, खोमनाळ, मारापूर, डोंगरगाव, सोड्डी, पौट, ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली, तर दुसऱ्या फेरीत ढवळस, बावची, भालेवाडी, मारोळी, राजापूर या ग्रामपंचायतीची मतमोजणी करण्यात आली.
 दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून मंगळेवढा तालुक्यामध्ये भालके व परिचारक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युती होत समविचारी गटाची स्थापना करण्यात आली. तोच पॅटर्न या ग्रामपंचायत निवडणुकीतही कायम राहिला. काही ठिकाणी आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने भारत भालके गटाबरोबर युती केली, तर भालके गट काही ठिकाणी परिचारक गटाबरोबर एकत्र आला होता. मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या गटाबरोबर गावगाड्यातील सत्तेसाठी नवा समविचार या निवडणुकीच्या निमित्ताने रुजवण्यात आला.
      पाटकळ येथे सरपंचपदासाठी आठ जण आखाड्यात होते. भालके व सिद्धेश्वर अवताडे यांच्या गटाने सत्ता ऋतुराज बिले हे सरपंचपदी विराजमान झाले. या ठिकाणी दामाजीचे संचालक महादेव लुगडे यांच्या गटाचा पराभव झाला. मारापूर येथे आमदार अवताडे समर्थक विनायक यादव विजयी झाले. दामाजीचे संचालक पी. बी. पाटील यांच्या गटाचा पराभव झाला. शिरनांदगी येथे मायाका थोरबोले  यांना दुसऱ्यांदा सरपंच होण्याचा मान मिळाला. डोंगरगाव येथे झालेल्या पंचरंगी लढतीत सारिका खिलारे या विजयी झाल्या. हाजापूर येथे पाच सदस्य यापूर्वी बिनविरोध झाले होते. दोन सदस्य व सरपंचपदाच्या निवडीत माधवानंद आकळे यांच्या नेतृत्वाखाली मैना देवकुळे या विजयी झाल्या. ढवळस येथे समविचारी गटाच्या रोहिणी हेंबाडे विजयी झाल्या. गुंजेगाव येथे आवताडे भालके युतीतून विमल चौगुले, तर खोमनाळ येथे बायडाबाई मदने विजयी झाल्या.गोणेवाडी येथे राष्ट्रवादीचे रामेश्वर मासाळ यांचे वर्चस्व राहिले. बावची येथे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाला सत्ता गमवावी लागली, त्या ठिकाणी भालके-परिचारक पुरस्कृत पॅनेलचे सर्व सदस्य विजयी झाले. मारोळी येथे दामाजीचे संचालक बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्व सदस्य मोठ्या फरकाने निवडून आले आहेत, राजकुमार पाटील हे सरपंचपदासाठी तालुक्यात ५५६ मतांनी विजयी झाले आहेत. सोड्डीत यादप्पा माळी गटाचे पाच सदस्य विजयी झाले. मात्र, सरपंचपदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने ‘गड आला; पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली. आमदार समाधान आवताडे यांच्या गटाचे शांतप्पा बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली गटाने सत्ता मिळवली.
   
   निकालानंतर सर्वच गटांनी तालुक्यातील सर्वच नेत्याच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांच्याकडून सत्कार स्वीकारत आम्ही तुमचेच आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला. याशिवाय भालेवाडी येथे जिल्हा परिषद सदस्य शीला शिवशरण यांनी समविचारी गटाच्या मदतीने सत्ता मिळविली आहे. येड्राव येथे माजी सभापती उपसभापती काशिनाथ पाटील यांच्या गटाचे वर्चस्व राहिले. संजय पाटील सरपंचपदी विजयी झाले. एकुणात मंगळवेढा तालुक्यातील जवळपास अकरा ग्रामपंचायतीवर समविचारी पॅनल चे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form