पंढरपूर पत्रकार संघाच्या निवडी जाहीर

पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जाकीर नदाफ यांची निवड अपराजित सर्वगोड कार्याध्यक्ष तर विकास पवार सचिव 
                                                             पंढरपूर ---  प्रतिनिधी                                   पंढरपूर पत्रकार संघ (रजि.) च्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज बुधवार दिनांक २८ रोजी पत्रकार भवन पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्षपदी जाकीर नदाफ तर कार्याध्यक्षपदी अपराजित सर्वगोड यांची एकमताने निवड करण्यात आली.                                  
   यावेळी निवड करण्यात आलेले इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे असून उपाध्यक्षपदी नवनाथ खिलारे,राजू बाबर,सचिवपदी विकास पवार,सहसचिवपदी यशवंत कुंभार, खजिनदारपदी  कबीर देवकुळे,प्रसिद्धी प्रमूखपदी अमीन शेख यांची निवड करण्यात आली.          

यावेळी पंढरपूर पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य संस्थापक हरिभाऊ प्रक्षाळे,रवी लव्हेकर,राजाभाऊ शहापूरकर,सचिन कांबळे यांच्यासह अभिराज उबाळे,राजू मिसाळ,माऊली डांगे, गणेश महामुनी,समाधान भोई, दगडू कांबळे, सचिन झाडे ,संजय रणदिवे,प्रताप वाघ,राजाभाऊ आटकळे, अमोल गुरव, प्रकाश सरताळे, ऋषी ननवरे आदी उपस्थित होते.       
    पंढरपूर पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नासाठी,समस्यांची सोडवणूक करण्याच्या हेतूने मार्गदर्शक जेष्ठ मार्गर्शक बाळासाहेब बडवे,महेश खिस्ते,रावसाहेब गोडगे,, अभिराज उबाळे,महेश कदम आदींच्या सहकार्याने आगामी काळात पंढरपूर पत्रकार संघ निर्धापूर्वक वाटचाल करील अशी ग्वाही यावेळी बोलताना संस्थापक हरिभाऊ प्रक्षाळे यांनी दिली   .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form