डॉ राजा दीक्षित (इतिहासाचे आणि साहित्याचे अभ्यासक, विश्वकोश महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य संस्कृती महामंडळ, मुंबई) यांच्या हस्ते
पंढरपूर --प्रकाश इंगोले
माणदेशी पुत्र डॉ नारायण भोसले हे बामणी, ता सांगोला, जि सोलापूर येथील मूळचे रहिवासी असून सध्या ते मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सामाजिक-सांस्कृतिक व ऐतिहासिक आशयाची स्वतंत्र अशी दहा संशोधित पुस्तके लिहिली आहेत, चार पुस्तके संपादित केली आहेत.अनेक अर्थाने चर्चेत असलेले त्यांचे 'देशोधडी' हे आत्मकथन 2021 मध्ये प्रकाशित झाले. या आत्मकथनाला अनेक प्रकारचे सन्मानाचे साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्यातच आणखी एक मानाचा समजाला जाणारा "दीनमित्रकार मुकुंदराव पाटील आत्मकथनात्मक साहित्य पुरस्कार" डॉ भोसले यांच्या देशोधडी या आत्मकथनास मिळाला. हा डॉ भोसले यांच्यासोबत मानदेशी मातीचाही सन्मान आहे. अहमदनगर जवळील तरवडी येथे डॉ राजा दीक्षित (इतिहासाचे आणि साहित्याचे अभ्यासक, विश्वकोश महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य संस्कृती महामंडळ, मुंबई) यांच्या हस्ते 18 डिसेंबर 2022 रोजी रोख रक्कम, सन्मान चिन्ह, शॉल व श्रीफळ देऊन प्रदान करण्यात येणार आहे. डॉ भोसले यांच्या साहित्याच्या निमित्ताने माणदेशी मातीचा सुगंध सर्वत्र पसरत आहे.