सोलापूर जिल्ह्यात आगामी ग्रामपंचायत, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत शत-प्रतिशत भाजपची सत्ता आणण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे --
मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस, भाजप
भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्राचे नव नियुक्त प्रदेश सरचिटणीस, तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यात आज सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्हा असे दोन स्वतंत्र मेळावे घेऊन जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकार्यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महापालिका निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या दृष्टीने आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजपची सत्ता आणण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी मेळाव्यात केले.
या दौर्यात मुख्यत्वे सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा आढावा, पक्षाची व्याप्ती, कृती आराखड्याची आखणी, बूथ सक्षमीकरण, पक्षबांधणी, संघटनात्मक विविध अभियाने आणि प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा आगामी दौरा अशा विविध विषयांवर श्री. मोहोळ यांनी संवाद साधला. केंद्रीय अभियान योजना धन्यवाद मोदीजी आणि ‘Friends of BJP’ या उपक्रमांविषयी कार्यकर्त्यांना श्री. मोहोळ यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना श्री. मोहोळ म्हणाले की, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातल्या सर्वात मोठ्या अशा या पक्षाचे वेगळेपण हेच आहे की, येथे सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळते. त्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला सातत्याने पक्षात काम केल्याचे फळ वेगवेगळ्या संधीच्या रुपातून मिळाले आहे.
श्री. मोहोळ म्हणाले, सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु त्या पक्षाने सोलापूरची हेळसांड केली. आता जिल्ह्यातील जवळपास सगळीच सत्तास्थाने, ग्रामपंचायती ते लोकसभा भाजपच्या ताब्यात जनतेने विश्वासाने सोपविली आहेत. त्यामुळे, आज सोलापूर हा भाजपचा गड झाला आहे. पुढील काळात सोलापूरचा गड आणखी बळकट करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी सोलापूरच्या विकासाचा सतत ध्यास घेतला पाहिजे. विकास करण्यासाठी गावागावातील ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा झेंडा फडकला पाहिजे. त्यासाठी या क्षणापासून कामाला लागावे लागेल."
मोहोळ पुढे म्हणाले, "आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आपल्या सर्वांना बूथ सक्षमीकरणावर काम करायचे आहे. प्रत्येकाने ठरवून दिलेल्या नियोजनानुसार आपापल्या भागातील बूथवर काम करायचे आहे. धन्यवाद मोदीजी हे अभियान राबवताना प्रत्येकाने आपापल्या भागातील विविध योजनांतील लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यावरही काम करायचे आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा सर्व जनतेपर्यंत पोहोचविणे हे भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे."
लाभार्थी संपर्क मोहीम राबविण्याची सूचनाही श्री. मोहोळ यांनी यावेळी केली.
बैठकीस जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह संघटन मंत्री मकरंद देशपांडे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, माजी सहकार मंत्री आमदार सुभाषबापू देशमुख, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,धैर्यशील मोहिते पाटील,शहाजी पवार, ॲड.सुजित भाऊ थिटे शशिकांत चव्हाण, प्रा, चांगदेव कांबळे, धनश्री खटके ,प्रकाश घोडके, मनीष देशमुख, रामचंद्र जनुक यांची उपस्थिती होती. प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी,मंडल पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.