मैत्र फाउंडेशनच्या संचालिका व माजी मराठी विभागप्रमुख, SCERT पुणे. सौ.सुजाता लोहकरे यांचे माता पालक सभेत मार्गदर्शन
करकंब प्रतिनिधी :-येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले क्रमांक दोन तेथे इयत्ता पहिलीच्या मातांची माता पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
माता-पालक सभेचे आयोजन रविवारदिनांक-११ रोजी जि.प. प्राथ.शाळा मुले क्र.२ करकंब येथे करण्यात आले होते.
मैत्र फाउंडेशनच्या संचालक व माजी मराठी विभागप्रमुख, SCERT, पुणे. सौ.सुजाता ताई लोहकरे .यांनी मुलांना चित्रयुक्त गोष्टींचे वाचन किती उपयुक्त आहे याचे मार्गदर्शन केले. अवांतर वाचनातून विचार करणे, तर्क करणे, अंदाज बांधणे, स्वतः चे म्हणणे योग्य शब्दात सांगता येणे या क्षमता कशा विकसित करायच्या याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
उपक्रम सुरू झाल्यापासून आजपर्यंत प्रत्येक मुलाने एकोणीस गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन केले आणि हा उपक्रम पुढेही चालू राहील असे सांगितले.
इयत्ता पहिलीचा पट ३१असून आज रविवार सुट्टी असून सुद्धा 26 मातापालक या मिटींगला हजर राहिल्याबद्दल त्यांनी सर्व मातांचे आणि वर्गशिक्षक रविकिरण वेळापूरकर सर यांचे कौतुक केले.
या उपक्रमाचा नियमित आढावा घेण्यासाठी दरमहा माता पालक मिटिंग घेऊन सर्व मातांना मार्गदर्शन करण्याचा त्यांनी संकल्प केला.