तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस संत दामाजी साखर कारखान्याचे गळीतास पाठवून कारखान्याच्या प्रगतीसाठी योगदान देणेचे आवाहन ---चेअरमन श्री शिवानंद पाटील
पुढे बोलताना ते म्हणाले कि, कारखाना उभारणीपासुन आजपर्यंत झालेल्या हंगामात कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त गाळपाचा उच्चांक कारखान्यातील कामगार,ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा व ऊस उत्पादक सभासदांचे सहकार्याने करु शकलो कारखान्याने आजपर्यंत ९०,१४०क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून दैनदीन टन साखर उतारा १० .५६% व सरासरी ९ .२१% मिळाला आहे , सोलापूर जिल्हयातील इतर कारखान्यांच्या तुलनेत दामाजी कारखान्याचा दैनिक साखर उतारा दुसऱ्या क्रमांकाचा असून सरासरी तिस-या क्रमांकावर आहे आमचे संचालक मंडळ कारखान्याच्या सत्तेत येवून चार महिने झाले आहेत कारखाना सुरु करण्यापूर्वीअनंत अडचणी आल्या अडचणीत असणाऱ्या दामाजीसाठी पांडूरंग कारखान्याचे चेअरमन मा श्री प्रशांत परिचारक मालक, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा श्री भगिरथदादा भालके, धनश्री परिवाराचे मार्गदर्शक मा प्रा श्री शिवाजीराव काळुंगेसर, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन मा श्री राहूल शहाशेठजी, जिजामाता महिला पतसंस्थेचे मार्गदर्शक मा श्री रामकृष्ण नागणेमामा, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन मा श्री दामोदरबापू देशमुख यांनी बँका पतसंस्थाच्या माध्यमातून कारखान्यास आर्थिक सहकार्य व मार्गदर्शन केल्याने हा गळीत हंगाम वेळेवर सुरु होण्यास मदत झाली
आमचे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात व सर्व संचालक मंडळ सदस्यानी मटेरियल खरेदी दुरुस्ती करणे, त्याचा पाठपुरावा करणे, तोडणी वाहतुक ॲडव्हान्स वाटप, दैनदिन कामकाज, कामगारांच्या अडचणी या प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष देवून काटकसर करुन वेळेत कारखाना सुरु करणेसाठी योगदान दिलेमुळे कारखान्याचे गाळप व्यवस्थीतपणे सुरु असून उद्दिष्टट उद्दिष्ट पूर्तीच्या्या दिशेने वाटचाल आहे.
कारखान्याची दैनदिन गाळप क्षमता प्रति दिवस २५०० मे टन असताना मशिनरी दुरुस्तीची कामे प्रत्यक्ष लक्ष देवून चांगल्या प्रकारे करुन घेतलेने प्रति दिवस ३७०० ते ३८०० मे टन सरासरी गाळप होत आहे कारखान्याचे सर्व सभासद-शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणचे कंत्राटदार, सिझन कामाचे कंत्राटदार या सर्वांच्या सहकार्यामुळेच कारखान्याचे गाळप सुरळीत चालू आहे ,तसेच चालू गळीत हंगामामध्ये संचालक मंडळाने ठरविलेले गाळपाचे उद्षि्ठ पूर्ण होणेसाठी तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस संत दामाजी साखर कारखान्याचे गळीतास पाठवून कारखान्याच्या प्रगतीसाठी योगदान देणेचे आवाहन चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी शेवटी केले
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा चेअरमन श्री तानाजी खरात, संचालक सर्वश्री प्रकाश पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा चेअरमन श्री तानाजी खरात, संचालक सर्वश्री प्रकाश पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते