लग्नपत्रिकेला अनन्यसाधारण महत्त्व
लग्नसोहळा म्हणजे हौसमौज, मानपान व सामाजिक प्रतिष्ठा यात सर्वात महत्त्वाचे भुमिका ही लग्नपत्रिकेची
पंढरपूर ---
लग्नसोहळा हा आंनदी सोहळा होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्नपत्रिका कोरोना काळात लग्न अत्यंत साध्या पद्धतीने लग्नकार्य उरकावे लागत होते. यंदा मात्र हौसमौज करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने आकर्षक व महागड्या लग्नपत्रिका घेण्याकडे विशेष कल दिसून येत आहे सध्या सर्वत्र लग्नसराईची धूम पाहावयास मिळत आहे. तुळशी विवाहानंतर आपल्याकडे लग्नाच्या तयारीला सुरुवात केली जाते सध्या डिजिटल युगात लग्नपत्रिकेचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे बोलले जात असले तरी कागदी पत्रिकेची क्रेझ आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. जसजशी लग्नघटिका समीप येत आहेत तसतशी लग्नपत्रिका खरेदीसाठी घाई केली जात आहे. बाजारात एक ते दोन हजारांपेक्षा अधिक विविध रंगाढंगाच्या पत्रिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ५००₹ शेकडा ते ६०००₹ शेकडा असा अदांजे दर मार्केट मध्ये दिसत आहे ,कागदांच्या वाढत्या किमती लक्षात घेता लग्नाला येणार नाही या मानपानाची विषयाची दक्षता घेऊन गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा लग्नपत्रिकांची छपाई अधिक करण्यात वधू वरां कडील मंडळी करीत आहेत
विशेष म्हणजे "लग्नपत्रिका" मिळाल्याशिवाय पाहुणे मंडळी उपस्थित राहणार अशी खात्री मात्र नक्की असते यामुळे सामाजिक प्रतिष्ठा हि यात आग्रही भूमिका दिसून येत असते
डिजिटल युगातही लग्नपत्रिक क्रेझ कायम स्वरुपी टिकून आहे.लग्नपत्रिकेत नावीन्यपूर्ण बदल व पारंपरिक पद्धतीने लग्नपत्रिका न छापता हटके पद्धतीने लग्नपत्रिका छापण्याचा ट्रेंड सुरू आहे. लग्नपत्रिकेवर वधू-वरांचा फोटो टाकणे त्याचबरोबर सामाजिक, जनजागृतीपर संदेश देणे, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळींचा फोटो आदी चित्रांचा समावेश पत्रिकेत करत असल्याचे पाहायला मिळतात लग्नपत्रिकेच्या दरवाढीचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. लग्नपत्रिकांची जोरदार छपाई सुरू असुन विविध प्रकारच्या लग्नपत्रिका बाजारात मिळत आहे.