भारताला शक्तीशाली व विश्वगुरु बनविण्यासाठी सर्व नारी शक्तीने घरात न बसता तन ,मन आणि धेयाने देशसेवा व समाजसेवा करण्यासाठीआपला परीवार संभाळत राष्ट्रीय कार्य करावे
पंढरपूर ---(विनोद पोतदार)
येथे पश्चिम महाराष्ट्र महिला पतंजलि योग समितीची बैठक सौ. सुधाताई अळ्ळीमोरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी त्या बोलताना म्हणाले की देश समृद्ध बनविण्यासाठी आरोग्याबरोबर, आचार, विचार ,आहार व मन आणि स्रीसंघटण काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सदर बैठकीस राज्य संवाद प्रभारी अनिताताई जोशी, राज्य कार्यकारीणी सदस्या अनुपमाताई कोरे,मंगलाताई वैद्य तसेच भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी सुरेंद्र पिसे, जिल्हा मिडिया प्रभारी मधुकर सुतार व जिल्हा संगठक दिलीप कोरके उपस्थित होते.
प्रास्ताविकात निसर्गोपचारतज्ञ ज्योतीताई शेटे यानी योगवर्गाबाबत माहिती देताना त्याचा अनेकानां झालेला फायदाही झाला आहे असे सांगीतले सुधाताई पुढे म्हणाल्या की भारताला शक्तीशाली व विश्वगुरु बनविण्यासाठी सर्व नारी शक्तीने घरात न बसता तन ,मन आणि धेयाने देशसेवा व समाजसेवा करण्यासाठीआपला परीवार संभाळत स्वामी रामदेव बाबा यांच्या देश सेवेच्या सतकार्याला सर्वानी सहकार्य करावे असे सर्व महिलानां केले
सदर बैठकीत जिल्हास्तरावरील कार्यासाठी सर्वानुमते ज्योती शेटे यांची निवड करण्यांत आली तर पंढरपूर तालुका महिला कार्यकारीणीची निवड करण्यात आली.
सदर बैठकीस ग्रामिण व शहरातील अनेक महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुरेंद्र पिसे सरानी केले तर शेवटी मधुकर सुतार यानी आभार मानले.