आज रविवार (दि. 20) कार्तिकी उत्पत्ती एकादशी आहे तर मंगळवार (दि. 22 ) माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा आहे. 3 लाखापेक्षा अधिक भाविक या सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाले आहेत
आळंदी --प्रतिनिधी
आज रविवार (दि. 20) कार्तिकी उत्पत्ती
एकादशी आहे तर मंगळवार (दि. 22 ) माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा आहे. 3 लाखापेक्षा अधिक भाविक या सोहळ्यासाठी आळंदीतदाखल झाले आहेत.
एकादशीच्या दिवशी रात्री 12 ते पहाटे 2 यावेळेत 11 ब्रम्हवृन्दाच्या वेदघोषात
माऊलींना महापूजा (अभिषेक व दुधारती) करण्यात येते.यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त,प्रशासकीय अधिकारी,ग्रामस्थ,
निमंत्रित उपस्थित असतात.
यावेळी महापूजेसाठी एका भाविक दाम्पत्याची निवड करण्यात येते. दर्शनबारीत सर्वात पुढे जे दाम्पत्यअसेल त्यांना महापूजेचा मान मिळतो.
आळंदी येथील कार्तिक वद्य एकादशी महापूजेचा मान अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सीआरपीएफ जवान गोरक्ष बाळासाहेब चौधरी (वय 29 ) आणि आयटी कर्मचारी सविता गोरक्षनाथ चौधरी (वय 25) या दाम्पत्याला मिळाला आहे.