आ.सामाधान आवताडे वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

"संकल्प रक्तदानाचा मानव सेवेचा" हे ब्रीदवाक्य समोर ठेवून रक्तदान करून  वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात -आ.समाधान आवताडे 
पंढरपूर : (प्रतिनिधी)
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान दादा आवताडे यांचे 21 नोव्हेंबर 2022 रोजी वाढदिवस असल्याने यानिमित्ताने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या निमित्ताने वाढदिवसासाठी कार्यकर्त्यांनी हार तुरे आणि पुष्पगुच्छ वगैरे खर्च न करता रक्तदान करून वाढदिवसाची भेट देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
.    यानिमित्ताने आमदार समाधान दादा आवताडे यांनी वाढदिवसासाठी दरवर्षी मित्रपरिवारासह, पक्ष सहकारी, हितचिंतक, कार्यकर्ते व त्यांच्यावर प्रेम करणारी असे विविध माध्यमातून शुभेच्छा देतात तर काहीजण भेटवस्तू, हार, तुरे, केक, होर्डिंग, बॅनर आदीच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात परंतु "संकल्प रक्तदानाचा मानव सेवेचा" हे ब्रीदवाक्य समोर ठेवून प्रत्येक प्रेम करणाऱ्या व्यक्तीने रक्तदानाचा संकल्प घेऊन उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान रुपी शुभेच्छा द्याव्यात व तेच आपल्यासाठी आशीर्वाद व शुभेच्छा असतील अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रिकेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form