विश्वराज महाडिक भिमा सह.साखर कारखान्याचे नुतन चेअरमन तर व्हा.चेअरमन सतीश जगताप

 महाडिक पॅनलनं भिमा कारखान्याच्या निवडणुकीत वर्चस्व मिळविल्या नंतर नुतन चेअरमनपदाची जबाबदारी महाडिक यांच्या तिसऱ्या पिढीवर आली आहे.
पंढरपूर--- (विनोद पोतदार) 
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भीमा शेतकरी विकास आघाडीने एक हाती तिसऱ्यांदा वर्चस्व मिळवित विजय संपादन केले कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडी आज रोजी गुरुवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १वा.जाहिर करण्यात आले चेअरमन पदासाठी विश्वराज महाडिक आणि उपाध्यक्षपदा साठी पुन्हा सतीश जगताप यांचीच वर्णी लागली आहे. 
      चेअरमन पदासाठी विश्वराज महाडीक यांच्या निवडीचे संकेत खासदारांनी निवडणूक सभेतच दिले होते. त्यामुळे त्यांच नांव निश्चीत झाले होते आज औपचारिक घोषणा करण्यात आली तर उपाध्यक्षपदासाठी सतीश जगताप यांनाच पुन्हा संधी मिळाली.
      

 संसदरत्न धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या उपस्थितीत आज पहिली बैठक झाली त्यावेळी सर्व नुतन संचालक, सभासद, शेतकरी व महाडिक परिवारातील सर्व विश्ववासु मंडळी, नागरिक, युवा मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form