*आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. ली. नंदूर* या साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ

  शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण समृद्धीसाठी आवताडे शुगर सातत्याने प्रयत्न करेल -आ. समाधान आवताडे
पंढरपूर----(प्रकाश इंगोले)                                मंगळवेढा येथिल आवताडे शुगर अँड   डिस्टिलरीज प्रा. ली. नंदूर या साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामातील पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकाससम्राट आमदार मा. समाधानदादा आवताडे व कार्यकारी संचालक मा. मोहन पिसे यांच्या शुभहस्ते  करण्यात आले.
       नव्या जोमाने आणि उत्साहाने गाळपास सज्ज झालेल्या आवताडे शुगर या साखर कारखान्याच्या पहिल्या ११ साखर पोत्यांच्या पूजनाचा हा सोहळा विशेष समाधान व आनंद देणारा होता. चेअरमन मा. संजय जी आवताडे मालक यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्यातील संचालक मंडळ, सर्व विभागातील खातेप्रमुख व कर्मचारी यांनी केलेल्या समर्पक कार्याची पोहचपावती म्हणजे या आजचा हा कार्यक्रम आहे. तसेच शेतकी विभागातील कार्ययंत्रणा  चौफेर बाजुंनी कृतीमग्न झाल्याने गाळप प्रक्रिया अजून गतिमान झाली. सदर प्रथम हंगामामध्ये अधिकाधिक उसाचे गाळप करून कर्मचाऱ्यांसह शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण समृद्धीसाठी आवताडे शुगर सातत्याने प्रयत्न करेल असा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना  व्यक्त केला. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form