शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांना मंदिर समितीकडून निमंत्रण

पंढरपूर (विनोद पोतदार):-
 कार्तिकी  शुध्द एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे.   शुक्रवार दि.04 नोव्हेंबर, 2022 रोजी  कार्तिकी  शुध्द एकादशी  असून,आज  गुरुवार दि. 20 ऑक्टोबर, 2022 रोजी मंत्रालय, मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना शासकीय महापूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.

 मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह .भ .प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते वारकरी पटका, वीणा व श्रीची मूर्ती भेट देऊन निमंत्रण देण्यात आले.
यावेळी  आमदार बालाजी किणीकर, मंदिर समितीचे सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे, ह भ प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड माधवी निगडे, ह. भ. प शिवाजीराव मोरे, ह .भ. प प्रकाश जवजाळ,  आचार्य तुषार भोसले,  अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी  संजीव जाधव, व्यवस्थापक  बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form