रितेश आणि जेनेलिया १० वर्षांनंतर मराठी चित्रपट वेडमध्ये एकत्र दिसणार
लोकप्रिय अजय आणि अतुल यांनी चित्रपटाचे संगीत दिलेल्या हा चित्रपट ३० डिसेंबर, २०२२ रोजी रिलीज होणार
मुंबई ----(सोशल मेडिया सौजन्याने)
माझा जन्म महाराष्ट्रातलाच मी अभिनयाला सुरवात केल्यानंतर हिंदी-तमिळ-तेलगू अशा विविध भाषांमधून चित्रपट केले.तिथे रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम मला मिळालं. रितेशच्या पहिल्या दिग्दर्शनाद्वारे मी मराठीत चित्रपटात पदार्पण करतेय. मराठीत काम करतांना मला एक वर्तूळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय.
जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. पण आता हे रिअल लाईफ कपल एकाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे. होय, रितेश आणि जेनेलिया १० वर्षांनंतर मराठी चित्रपट वेडमध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटातून जेनेलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
वेड या चित्रपटातून मराठी अभिनयात पदार्पण करणारी जेनेलिया देशमुख या चित्रपटाची निर्मातीही आहे. या चित्रपटात जिया शंकर आणि अशोक सराफही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच, हा असा चित्रपट आहे ज्यात लोकप्रिय अजय आणि अतुल यांनी चित्रपटाचे संगीत दिले आहे. हा चित्रपट ३० डिसेंबर, २०२२ रोजी रिलीज होणार आहे.